शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' एका गोष्टीमुळे लैंगिक जीवनाचा घेऊ शकाल दुप्पट आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 16:31 IST

शारीरिक संबंधाबाबत अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात. त्यात महिलांना असणारी एक मोठी समस्या म्हणजे स्वत:च्या शरीराबाबत वाटणारा संकोच.

शारीरिक संबंधाबाबत अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात. त्यात महिलांना असणारी एक मोठी समस्या म्हणजे स्वत:च्या शरीराबाबत वाटणारा संकोच. अनेक महिलांना शरीराबाबत संकोच वाटत असल्याने लैंगिक क्रियेत अनेक अडचणी येतात. जर तुम्ही स्वत: तुमच्या शरीराबाबत सहज नसाल तर अर्थातच पार्टनर समोर आल्यावर तुम्हालाही संकोच वाटणारच. या सर्व गोष्टीमुळे नात्यात सहजताच राहणार नाही आणि तुम्हाला पार्टनरसोबत कनेक्टेड वाटणार नाही. 

शरीराबाबत असहज असण्यामुळे लैंगिक जीवन प्रभावित होतं आणि तुम्हाला संतुष्टी मिळणार नाही. एक्सपर्ट्सनुसार, एकच अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला चांगला लैंगिक अनुभव मिळू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे पार्टनरची स्तुती, तिचं कौतुक करणं. ही बाब जरी फारच शुल्लक किंवा विचित्र वाटत असली तरी ही गोष्ट केल्याने तुमचं लैंगिक जीवन वेगळं ठरू शकतं. 

जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित एका रिसर्चसाठी १८ ते ३० वयोगटातील २०० महिलांवर अभ्यास करण्यात आला. या सर्व महिला कमिटेड रिलेशनशिपमध्ये होत्या. या रिसर्चदरम्यान महिलांना विचारण्यात आले की, त्यांना त्यांच्या बॉडीबाबत काय वाटतं? आणि त्यांचे पार्टनर त्यांच्या बॉडीबाबत काय विचार करतात?

तसेच अभ्यासकांनी महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत आणखीही काही प्रश्न विचारले. त्यात त्यांना शारीरिक संबंधाची इच्छा किती वेळ जागृत होते, त्यांच्या उत्तेजनेचा स्तर काय असतो, लुब्रिकेशन, किती वेळा ऑर्गॅज्मचा अनुभव होतो आणि शारीरिक संबंधानंतर संतुष्टीचा अनुभव होतो का? हे प्रश्न विचारण्यात आलेत.

त्यावरून काढण्यात आलेले या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, ज्या महिलांच्या पार्टनरने त्यांच्या लुक्सचं आणि शरीराचं कौतुक केलं त्या महिलांना जास्त संतुष्टीचा अनुभव मिळाला आणि त्यांची कामेच्छा सुद्धा अनेक पटीने जास्त होती. पण ज्या महिला त्यांच्या शरीराबाबत असहज होत्या किंवा ज्यांना संकोच वाटला, त्यांना यातील कुठलाच चांगला अनुभव आला नाही. या रिसर्चनुसार, जे पुरूष पार्टनर खास क्षणांवेळी त्यांच्या पार्टनरचं कौतुक करतात किंवा त्यांची स्तुती करतात त्या महिलांची कामेच्छा अधिक चांगली असते. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स