शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत होणार सौरऊर्जेचा लखलखाट-राज्यात साताऱ्याला पहिला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:51 IST

नितीन काळेल । सातारा : सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जेतून झेडपीत लखलखाट ...

ठळक मुद्दे वर्षाला २५ लाखांच्या वीजबिलांची बचत, ४७ लाखांची तरतूद--लोकमत विशेष..

नितीन काळेल ।

सातारा : सातारा जिल्हा परिषदेने विविध उपक्रम, अभियानात देशात डंका वाजवला असतानाच आता सौरऊर्जेतून झेडपीत लखलखाट पसरणार आहे. त्यासाठी ४७ लाखांची तरतूद झाली असून, युनिट उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. यामुळे वर्षाला २५ लाखांची बचत होणार आहे. तर या सौरऊर्जेमुळे सातारा जिल्हा परिषद राज्यात प्रथम मान मिळविणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेने गेल्या १५ वर्षांत विविध उपक्रम, अभियानाच्या माध्यमातून देशभर नावलौकिक केला आहे. तर अवघ्या चार महिन्यांपूर्वी साताºयाने स्वच्छतेत देशात डंका वाजवला होता. सतत नवनवीन उपक्रम राबविणे, अभियान यशस्वी करणे यामध्ये जिल्हा परिषद आघाडीवर आहे. आतातर जिल्हा परिषदेत सौरऊर्जेचा लखलखाट पसरणार आहे.

जिल्हा परिषदेत विविध विभाग आहेत. परिसरही मोठा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला दर महिन्याला सुमारे सव्वादोन लाख रुपये वीजबिल येते. वर्षाचा विचार केला तर २५ लाखांहून अधिक रक्कम ही विजेसाठी खर्च करावी लागत होती. याचा विचार करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तशी पावले पडू लागली. या प्रयत्नातूनच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी सुमारे ४७ लाख रुपयांची तरतूद झाली.

गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या टेरेसवर सोलर युनिट उभारण्याचे काम सुरू झाले आहे. ‘मेडा’ विभागाच्या वतीने हे काम करण्यात येत आहे. उभारण्यात येणारे हे युनिट १०० केव्हीचे आहे. दररोज त्यामधून १०० केव्ही वीज तयार होणार आहे. त्यातून पूर्ण जिल्हा परिषदेत वीज मिळू शकते. तर सध्या जिल्हा परिषदेला दर दिवसाला ९० केव्हीपर्यंत वीज लागते. याचा विचार करता वीज काही शिल्लक राहणार आहे. ती विकूनही जिल्हा परिषदेला पैसे मिळू शकतात. दरम्यान, सौरऊर्जेची वीज ही वीज कंपनीला देऊन त्यांची वीज घेण्यात येणार आहे. तसा करार वीज कंपनीशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

आतापर्यंत वीज ही पाणी, कोळसा आदी घटकांवर निर्माण होत होती; पण काहींमुळे प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी आपल्याकडे अपारंपरिक घटकातून वीज मिळविण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाशावर वीज तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नियोजन समितीतून सुमारे ४७ लाख रुपयांची तरतूद झाली. सध्या सौरऊर्जा युनिट उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे दरवर्षी किमान २५ लाख रुपये वाचणार आहेत.- कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद