शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:06 IST

सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू ...

ठळक मुद्देपाणीदार गावासाठी जिल्हा परिषदेचे पाठबळ !चिलेवाडीत महाश्रमदान : अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग

सातारा : माळ, शिवार पाणीदार करण्यासाठी गावेच्या गावे जलसंधारण चळवळीत उतरलीत. अशाचप्रकारे चिलेवाडीनेही वॉटर कपमध्ये सहभाग घेत काम सुरू केले आहे. या कामाला आपलेही पाठबळ मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी महाश्रमदानासाठी हजेरी लावत हाती टिकाव, खोरे घेतले.राज्यात गेल्या चार वर्षांपासून पाणी फौंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारण आणि मनसंधारणाचे मोठे काम होऊ लागले आहे. जलसंधारणामुळे पासाळ्यात माळ, शिवारात पाणी साठून टंचाई दूर होऊ लागलीय. तसेच अनेक गावे पाणीदारही झाली आहेत. त्यामुळेच ही चळवळ आता पाणीदार म्हणून पुढे आली आहे.

या चळवळीत ग्रामस्थ सहभाग घेतात. तसेच अधिकारी आणि अभिनेतेही सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढवत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेने कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीत महाश्रमदानाचे आयोजन केले होते.महाश्रमदानादिवशी चिलेवाडीत सकाळी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे (ग्रामपंचायत) आदींसह गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित झाले.

त्यानंतर श्रमदान होणाऱ्या ठिकाणी सर्वजण गेले. कोणी हातात टिकाव घेतला तर कोणी खोरे, पाटी घेतली. जवळपास चार तास महाश्रमदानाचे काम करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असतानाही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिलेवाडी गावाच्या पाणीदार चळवळीसाठी हातभार लावला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडतरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यामुळे श्रमकर्त्यांचा उत्साहही वाढला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर