शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

गोळ्या घालून युवकाचा खून

By admin | Updated: June 10, 2014 02:13 IST

कऱ्हाडनजीक भरवस्तीत घटना : हल्लेखोरांच्या सॅकमध्ये आढळली पिस्तुले, कोयता

कऱ्हाड : शहरानजीकच्या जखीणवाडीत मयूर गोरे या पिग्मी एजंट युवकाचा पाठलाग करत मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून व डोक्यात खोरे घालून निर्घृण खून केला. आज, सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृत युवकाच्या मावस भावावरही त्या मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. मात्र, तो नजीकच्या उसाच्या शेतात पळून गेल्याने बचावला. खुनानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. मयूर मोहन गोरे (वय २५, रा. पंताचा कोट, सोमवार पेठ, कऱ्हाड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयूर गोरे एका बँकेसाठी पिग्मी गोळा करण्याचे काम करीत होता. मयूरच्या मोबाईलवर आज सकाळी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘आम्हाला पिग्मीचे खाते उघडायचे आहे,’ असे सांगून संबंधित व्यक्तीने मयूरला भेटण्यासाठी मलकापूरला बोलवले. दुपारी दीडच्या सुमारास मावस भाऊ सिद्धार्थ पवारला घेऊन मयूर दुचाकीवरून मलकापूरला गेला. मलकापुरात वास्तव्यास असलेल्या मावशीकडे जेवण केल्यानंतर दोघेही दुचाकीवरून महामार्गावर मलकापूर फाटा येथे गेले. तेथून मयूरने संबंधित क्रमांकाला फोन करून ‘भेटायला कोठे यायचे,’ याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्या व्यक्तीने जखिणवाडी रस्त्याला येण्यास सांगितले. मयूर व सिद्धार्थ दुचाकीवरून जखीणवाडी रस्त्याला काही अंतरापर्यंत गेले. त्यावेळी रस्त्यावरच लोकवस्तीनजीक दोन युवक दुचाकीवर थांबले होते. मयूर व सिद्धार्थने त्या युवकांना ‘तुम्हीच फोन केला होता का,’ अशी विचारणा केली. ‘आम्हीच’ फोन केल्याचे सांगून, त्या दोघांनी मयूर व सिद्धार्थला पाणंद रस्त्याने डोंगराच्या दिशेने नेले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी दोघांना थांबविले. तोपर्यंत अन्य दोन युवक दुचाकीवरून तेथे आले. संबंधित चौघांमधील एकाने ‘हाच का मयूर,’ अशी विचारणा केली. दुसऱ्याने होकार दिल्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेल्या सॅकमधून धारदार कोयता काढून मयूरवर वार केला. तो वार मयूरने हातावर झेलला. त्यानंतर घाबरलेले मयूर व सिद्धार्थ तेथून पळाले. सिद्धार्थ उसाच्या शेतात तर मयूर रस्त्याकडे धावला. त्यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने सॅकमधील पिस्तूल काढून मयूरच्या दिशेने पहिली गोळी झाडली. मात्र, ती मयूरला लागली नाही. मयूर रस्त्याकडे पळत असताना हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. रस्त्यावर लोकवस्तीत पोहोचल्यानंतर मयूर एका घराच्या दिशेने धावला. मात्र, उंबऱ्यातच तो कोसळला. त्यावेळी हल्लेखोरांनी लाकडी दांडके व खोऱ्याने त्याला मारहाण केली. तसेच त्यांनी मयूरवर दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी मयूरच्या चेहऱ्याला लागली. या हल्ल्यात मयूरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांना हल्लेखोरांची सॅक सापडली असून, त्यामध्ये दोन पिस्तुले व कोयता आढळून आला आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)