शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: रक्तानं लिहलं पत्र; पंढरपूरहून पायी चालत गाठला सातारा; मजकूर वाचून उदयनराजे झाले भावुक

By सचिन काकडे | Updated: November 8, 2023 17:18 IST

..तर पुढची पिढी माफ करणार नाही : उदयनराजे 

सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषण सुरू असून, सोलापूर जिल्ह्यातील दोन तरुणांनी बुधवारी थेट सातारा गाठला. पंढरपूर ते सातारा तब्बल १८५ किलोमीटर अंतर पायी चालत येऊन या तरुणांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. तसेच मराठा आरक्षणाची मागणीही केली.शहाजी दांडगे, (रा. मुंडेवाडी, ता. पंढरपूर) व ज्ञानेश्वर गुंड (रा. आष्टी, ता. मोहोळ) असे या तरुणांचे नाव आहे. मराठा आंदोलनाचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील या तरुणांनी पंढरपूर ते सातारा अशी १८५ किलोमीटर पदयात्रा काढली. पंढरपूर, महुत, दिघंची, मायणी, औंध असा पाच दिवस पायी चालत प्रवास करून दोघे तरुण बुधवारी साताऱ्यात दाखल झाले. या प्रवासात त्यांना नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. जेवणासह त्यांच्या राहण्याचीदेखील व्यवस्था केली. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र देखील दिले. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी केलेला हा प्रवास आणि त्या पत्रातील मजकूर वाचून उदयनराजे भावुक झाले.

..तर पुढची पिढी माफ करणार नाही : उदयनराजे 

  • उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून आपले सडेतोड मत व्यक्त केले. तरुणांनी दिलेल्या पत्राचा आधार घेत ते म्हणाले, निवडणुका आणि आरक्षण यांचा काहीही संबंध नाही.
  • निवडणुका घ्या अगर नका घेऊ; परंतु आरक्षणाचा विषय हा मार्गी लागलाच पाहिजे. यावर ठोस निर्णय न घेतल्यास पुढची पिढी तुम्हाला आणि आम्हाला कदापी माफ करणार नाही.
  • आमदार असो किंवा खासदार तुम्ही ज्या पदावर आहात ते केवळ समाजामुळे आहात. लोक तुम्हाला निवडून देतात याचा अर्थ त्यांच्या विश्वासाला पात्र राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. 
  • जोपर्यंत जनगणना होत नाही, प्रत्येकाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. 
  • मराठा आरक्षणासाठी जर आत्महत्या वाढू लागल्या तर याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.
  • आरक्षणाबाबत प्रत्येक वेळी सोयीप्रमाणे एक महिना, दोन महिना वेळ वाढवून घ्यायची, हे नेमकं काय चाललंय? हेच कळत नाही.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण