शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कृष्णा पुलावरुन तरुणीची नदीपात्रात उडी, कऱ्हाडमधील घटना; दोन दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:43 IST

घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड मधील कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने थेट नदीत उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे त्या तरुणीचा दोन दिवसांपूर्वीच साखरपुडाही झाला होता. कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय २६, सध्या रा. वाखाण रोड, कऱ्हाड, मूळ रा. जत, जि. सांगली) असे उडी मारलेल्या तरुणीचे नाव आहे. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.कल्पना वाघमारे ही तरुणी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली. गाडी उभी करून ती मोबाइलवरून कोणाशी तरी बोलली. त्यानंतर तिने थेट नदीत उडी मारली. ही घटना पाहून आरडाओरडा केल्यानंतर वाहनधारकांची पुलावर मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती दिल्यानंतर कऱ्हाड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुलावर तरुणीची दुचाकी आणि सॅक आढळून आली.दरम्यान, तरुणीशी लग्न ठरलेला मुलगा काही वेळातच घटनास्थळी पोहोचला. तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकही आले. पोलिसांनी तरुणीची सॅक आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबीयांनी ओळखले. त्यानंतर तरुणीच्या आईने हंबरडा फोडला. वडिलांनाही जबर धक्का बसला.

दिवसभर तरुणीचा शोधकल्पना वाघमारे ही खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. सॅकमध्ये तिची पर्स, ओळखपत्र आणि इतर साहित्य आढळून आलं. त्यावरून कल्पनानेच नदीत उडी मारल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तातडीने एनडीआरएफ टीमला पाचारण केलं होतं. तसंच स्थानिक मच्छीमारही उपस्थित होते. मात्र, अंधारामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी पुन्हा तरुणीचा शोध सुरू करण्यात आला आहे.