शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-अबुधाबीवरून आलेला युवक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:19 IST

अबुधाबीवरून आलेल्या एका तीस वर्षीय युवकाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली त्याला ठेवण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देअबुधाबीवरून आलेला युवक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखालीविलगीकरण कक्षात दाखल

सातारा : अबुधाबीवरून आलेल्या एका तीस वर्षीय युवकाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली त्याला ठेवण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले आहे.सातारा जिल्ह्यातील रहिवाशी असणारा संबंधित तीस वर्षीय तरूण दोन दिवसांपूर्वी अबुधाबीवरून मुंबईत आला. तेथे एक दिवस राहिल्यानंतर तो गावी आला. त्यावेळी त्याला खोकला, ताप आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला. या प्रकाराची माहिती त्याच्या घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला दिली.त्यानंतर पथकाने संबंधित युवकाला तत्काळ रुग्णालयात घेऊन येण्याचा सल्ला दिला. संबंधित रुग्णाला मध्यरात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या युवकाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याला कशामुळे त्रास होतोय, हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत परदेशातून १८ जण आले आहेत. यामध्ये केवळ एकाच रुग्णाला त्रास होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हाखटाव तालुक्यातील पुसेगाव येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले, अशी खोटी बातमी तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका खासगी वृत्तवाहिनीचा लोगो वापरुन खटाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, पुसेगाव परिसरात दोन रुग्ण आढळले, अशा आशयाची बनावट बातमी तयार करुन व्हायरल करण्यात आली होती. अशी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोनाSatara areaसातारा परिसर