शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:30 IST

पूर्व वैमनस्यातून करंजेमधील प्रथमेश अरूण पिसाळ (वय १८, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) या युवकावर तिघांनी कोयत्याने खूनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सांयकाळी घडला. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देपूर्व वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वारतिघांवर गुन्हा ; करंजेतील घटनेने खळबळ

सातारा : पूर्व वैमनस्यातून करंजेमधील प्रथमेश अरूण पिसाळ (वय १८, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) या युवकावर तिघांनी कोयत्याने खूनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सांयकाळी घडला. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धांत संजय किर्दत, अजिंक्य गणेश किर्दत, मयुरेश रवींद्र भोसले (सर्व रा. करंजे पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रथमेश पिसाळ हा त्याच्या मित्रांसमवेत दि. ६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कंरजे येथील मानकेश्वर मैदानात मित्रांसमवेत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी वरील संशयित तिघे दुचाकीवरून त्याठिकाणी आले. प्रथमेशला शिव्या देऊ लागले.

यावेळी प्रथमेशने शिव्या न देण्याबाबत व शिव्या देण्याचे कारण विचारले असता त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर याचे रुपांतर मारामारीत झाले. सिध्दांत याने त्याच्या कमरेला लावलेल्या कोयत्याने प्रथमेशच्या डोक्यावर वार केले. तर इतर दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत प्रथमेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, सिध्दांत संजय किर्दत (वय १९) याने दिलेल्या फियार्दीवरून प्रथमेश अरूण पिसाळ, सोमनाथ दीपक पवार, शुभम पिसाळ, चिन्मय गायकवाड, नितेश पिसाळ (सर्व रा. करंजे पेठ, सातारा) यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संशयितांनी हॉकी स्टिकने मारहाण केल्याचे सिद्धांत किर्दत याने आपल्या फिर्यादित म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर