शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळासह घुबडाची तस्करी करणाऱ्याला तरूणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:01 IST

घुबड व मांडूळाची तस्करी करून कृष्णानगर परिसरात विक्रीसाठी आलेल्या अनिकेत शंकर यादव (वय २२,रा. कृष्णानगर वसाहत, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून घुबड, मांडूळ असे दहा लाख रुपये किंमतीचे वन्यजीव पोलिसांनी हस्तगत केले. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमांडूळासह घुबडाची तस्करी करणाऱ्याला तरूणाला अटकस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा : घुबड व मांडूळाची तस्करी करून कृष्णानगर परिसरात विक्रीसाठी आलेल्या अनिकेत शंकर यादव (वय २२,रा. कृष्णानगर वसाहत, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून घुबड, मांडूळ असे दहा लाख रुपये किंमतीचे वन्यजीव पोलिसांनी हस्तगत केले. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ३ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार प्रसन्न जऱ्हाड हे कर्मचाऱ्यांसवेत सातारा ते कोरेगाव रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी कृष्णानगर इरिगेशन वसाहतीजवळ अनिकेत यादव त्यांच्या निदर्शनास आला.

जऱ्हाड यांनी त्याला बोलावून घेतले असता, तो पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली त्यावेळी त्यात एक सर्प व घुबड पोलिसांना सापडले. याबाबत त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते दोन्ही वन्यजीव काळ्याबाजारात विक्रीसाठी आणल्याची त्याने कबुली दिली.

काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:च्या घराच्या परिसरात मांडूळ पकडले होते. तर घुबड हे त्याने गावाकडे पकडले होते. या दोन्हींची विक्री करून बक्कळ पैसे कमविण्याचा त्याचा बेत होता. पोलिसांनी वन विभागाशी संपर्क साधून यादव याला पुढील चौकशीसाठी वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनिर मुल्ला, अजित कर्णे, निलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, संजय सावंत यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :snakeसापSatara areaसातारा परिसर