शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवारात काम करताना अचानक लांडग्याने केला हल्ला, एक युवक व महिला जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 19:28 IST

शिवारात काम करीत असताना अचानक लांडग्याने हल्ला केला. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले. 

वाठार : फलटण तालुक्यातील वाखरी गावात लांडग्यांच्या हल्ल्यात एकोणीस वर्षीय युवक व महिला जखमी झाली. स्वप्नील संतोष ढेकळे (वय 19) व सुनंदा मुगुट ढेकळे अशी या जखमींची नावे आहेत. शिवारात काम करीत असताना अचानक लांडग्याने हल्ला केला. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले. याबाबत माहिती अशी की, दालवडी ते वाखरी या रस्त्यावर वाखरी गावच्या हद्दीतील झिरप नावाच्या शिवारात शेतकरी काम करीत होते. यावेळी स्वप्नीलवर लांडग्याने अचानक हल्ला केला. यावेळी शेजारी काम करीत असलेल्या सुनंदा ढेकळे याही किरकोळ जखमी झाल्या.इतर दोन शेतकऱ्यांच्याही अंगावर लांडगा धावून गेला, मात्र त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर लांडग्याने पळ काढला. मात्र या प्रकारच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेतात काम करताना भीती व्यक्त करीत आहेत.वनविभागाने तातडीने लांडग्याचा बंदोबस्त करावा तसेच जखमी झालेल्या स्वप्नील याला तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संतोष ढेकळे यांनी केली आहे.

या बाबतीत तालुका वन विभागाने अधिकारी मारुती निकम यांच्याशी संपर्क साधला असता उपचारासाठी लागणारा सर्व खर्च आपल्या विभागाकडून देण्यात येईल तसेच सापळा लावून लांडगा पकडून इतरत्र सोडून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तर, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना खबरदारी घ्यावी असे आवाहनही केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर