शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

तरूण पिढीची खादीकडे पाठ! लोकमत सर्वेक्षण

By admin | Updated: July 21, 2014 23:08 IST

ज्येष्ठांमध्ये अजूनही ‘क्रेझ’ : देखभाल खूप आणि वैविधता कमी

प्रगती जाधव-पाटील - सातारा बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेले हजारो व्हरायटीचे शर्ट आणि पॅन्ट, महिना दोन महिन्याला बदलत जाणाऱ्या फॅशन आणि मेन्टेनन्सची चिंता या कारणामुळे तरूणाईने खादीच्या वापराकडे पाठ फिरविली आहे, तर मध्यमवयीन आणि ज्येष्ठांवर अजूनही खादीची मोहिनी कायम आहे.सातारा शहरात गाझियाबाद, हरियाणा व पुणे आदी ठिकाणांहून खादीचे कापड येते. बघताक्षणी मोहात पडावं अशा रंगांमध्ये आता खादी उपलब्ध असली तरीही ती खरेदी करण्याकडे तरूणाईचा कल जरा कमी आहे. किंमत आणि मेन्टेनन्सला अधिक असल्यामुळे तरूणाई खादीला प्राधान्य देत नाही. त्याउलट मध्यवयीन व ज्येष्ठांवर मात्र खादीची मोहिनी अजून कायम आहे. पुरूषांच्या बरोबरीनेच महिलांनाही खादीच्या साड्यांची भुरळ पडत आहे. विशिष्ट रंगसंगतीत ‘डिसेंट डिझाईन’ असलेली साडी महिलांना मोहात पाडते. मोजक्याच आणि देखण्या साड्या खादीत येत असल्यामुळे या खरेदी करण्याकडे महिलांचा कल अधिक आहे. या साड्यांचे दरही बाराशे ते अडीच हजार रूपयांपर्यंत असतात.तेच ते ड्रेस मटेरियल घालून कंटाळलेल्या तरूणींना मटका खादीचे विशेष आकर्षण आहे. थोडी भडक रंगसंगती आणि आकर्षक डिझाईनमुळे हे ड्रेस मटेरियल तरूणींना भावते. खास कार्यक्रमासाठी तरूणी खादीच्या ड्रेसला पसंती देतात. हे ड्रेसही आता पाचशे रूपयांपासून दोन हजारापर्यंत उपलब्ध आहेत.रोज बदलत जाणाऱ्या फॅशनच्या दुनियेत म्हणूनच खादी वेळ खाऊ वाटते; पण काहीजण आजही याचे डायहार्ट फॅन आहेत. पेपर सिल्कला पुरूषांची सर्वाधिक पसंतीपुरूषांमध्ये पेपर सिल्क खादीला विशेष पसंती दिली जाते. हे कापड प्रामुख्याने शर्टसाठी वापरण्यात येते. अंगाबाहेर राहणारे, कडक लुक देणारे, इस्त्री न मोडणारे आणि फिकट रंग ही या कापडाची खासीयत आहे. सुती खादीच्या तुलनेत या कपड्यांची निगा कमी राखावी लागते. तेच ते कॉटन, टेरिलीन, टेरिकॉट कापड घालून कंटाळलेल्यांसाठी खादी हा सर्वाेत्तम पर्याय आहे. फॅन्सी बटण आणि कफ्लिंग्स लावून खादीचे शर्टही ‘फेस्टिव्ह’ होऊ लागले आहेत.मटका खादी महिलांचे आकर्षणसाडी हा महिलांचा वीक पॉर्इंट मानला जातो. कितीही साड्या असल्या तरी ‘तिची’ साडी सुरेखच होती, हे म्हणण्याची महिलांची सवय आहे. मटका खादीमध्ये असणाऱ्या साड्याही अशाच वनपीस असतात. एक से एक डिझाईन आणि हलक्या रंगांमध्ये येणाऱ्या या साड्या महिलांना आकर्षित करतात. अन्य फॅन्सी साड्यांच्या तुलनेत या साड्या स्वस्त आणि डिझायनर वाटतात. त्यामुळे विशेष कार्यक्रम, घरगुती गेट-टुगेदर अशांसाठी या साड्यांना प्राधान्य दिले जाते.खादीचे कपडे अन्य कपड्यांच्या तुलनेने महाग असतात. त्यांची निगा ठेवावी लागते. महाविद्यालयीन युवक-युवतींना फॅशनेबल आणि रंगीत कपडे घालायला आवडतात. हे कपडे त्यांना बाजारात कमी किमतीत मिळतात. त्यामुळे तरूणाई खादीचे कपडे घ्यायला प्राधान्य देत नाही.- विक्रम भोरे, खादी व्यावसायिकखादीचे प्रकारकापडाचा रंग कापडाचा वापरसिल्क खादीपांढरा व फिकट रंग पुरूषांसाठी शर्ट-महिलांसाठी कुर्तापॉली खादीरंगीत व पांढरेहीपुरूषांसाठी शर्ट-महिलांसाठी ड्रेस मटेरियलसुती खादीपांढरा रंगपुरूषांसाठीच शर्ट- इस्त्री, स्टार्च आवश्यकचफॉर्मल आणि फंक्शनल या दोन्ही प्रकारच्या शर्टला उत्तम पर्याय म्हणजे खादी. डिसेंट आणि तितकाच भारदस्त लुक या शर्टमुळे येतो. नेटकेपणा आणि टापटीप आवडणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी खादीचा शर्ट वापरून पाहावा. यातील वावरणं खूप सुखावह असते.- अभिनंदन मोरे, नोकरदार