शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तू सीमेवर लढ... तुझ्या कुटुंबाची काळजी घेऊ, अन् सैनिक पित्याला बेड मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 06:08 IST

सैनिक पित्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनीही प्रशासनाकडे विनंती केली. तोपर्यंत फलटणमध्ये सर्व हॉस्पिटल फिरून तरुण हतबल झाला होता

ठळक मुद्देसैनिक पित्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनीही प्रशासनाकडे विनंती केली. तोपर्यंत फलटणमध्ये सर्व हॉस्पिटल फिरून तरुण हतबल झाला होतासैनिक पित्याला तातडीने मिळवून दिला बेड

फलटण : भारताच्या सीमेवर दहशतवादी विरोधी पथकात लढणाऱ्या फलटण येथील एका सैनिक पित्याची तब्येत कोरोना संसर्गामुळे मध्यरात्री दीड वाजता अत्यवस्थ झाली. घरात त्यांची मुलगी व तिची दोन लहान मुले एवढेच लोक होते. रात्रीची वेळ असल्याने मदत मिळेना. याचवेळी मलटण येथील प्रसाद कारखानीस यांनी या सैनिक पित्याला मदत करावी असा संदेश सोशल मीडियावर टाकला अन् काही वेळेत बेड उपलब्ध करुन दिला. याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील एका सैनिक पित्याची तब्येत कोरोनामुळे अचानक बिघडली. पण कोठून मदत मिळत नव्हती. हे समजल्यावर प्रसाद कारखानीस यांनी ‘एका सैनिक पित्याला मदत करावी,’ असा संदेश सोशल मीडियावर टाकला. हा संदेश मलटणच्या ‘लोकमत’ प्रतिनिधीने उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना पाठवला.

सैनिक पित्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनीही प्रशासनाकडे विनंती केली. तोपर्यंत फलटणमध्ये सर्व हॉस्पिटल फिरून तरुण हतबल झाला होता. एका सैनिक पित्याला व त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कोणताही परिचय नसताना हा तरुण रात्री दीड वाजेपर्यंत फिरत होता. याचवेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करून बेड उपलब्ध करून देऊ रुग्णास घेऊन या असा फोन केला. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबीयांची जबाबदारी म्हणून काही व्यक्ती धडपडत होते. हे लक्षात आल्यावर उपविभागीय अधिकारी यांनी रात्री सुद्धा एका संदेशाची दखल घेत सैनिक पित्यासाठी बेड उपलब्ध करून दिला. यातून ‘तू सीमेवर लढ तुझ्या कुटुंबाची काळजी आम्ही घेतो’ असाच संदेश दिला. यामुळे सैनिकाला दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यास आणखी बळ देईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Armyभारतीय जवान