शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातारी नेत्यांचा ‘योगा डे’

By admin | Updated: June 21, 2016 01:21 IST

सुपरहिट

पूर्वीच्याकाळी लोकांना फक्त ‘मन्ना डे’ माहीत.. नंतर ‘शोभा डे’ ठावूक झाल्या.. परंतु आजकाल रोज कुठला नां कुठला ‘डे’ साजरा करण्याची प्रथाच सुरू झालेली. आज तर ‘योगा डे’. मग काय सुप्रसिध्द ‘योगदेव बाबा’ साताऱ्यातील नेत्यांना ‘योगा’ शिकविण्यासाठी दाखल झालेले. सर्वच पक्षांचे नेते या योग शिबिराला जातीनं हजर झालेले. सत्ता नसल्यानं ‘हातात घड्याळ’ बांधून गांधी टोपीवाले जमलेले. सत्ता असूनही मुंबईत कुणी किंमत देत नसल्यानं ‘भगवं’ उपरणं पांघरून सत्ताधारीही आलेले. तेव्हा या शिबिरात काय-काय धम्माल झाली, त्याचाच हा रसिला वृत्तांत...जयाभाव : आत येण्यापूर्वी सर्वांनी आपापली पादत्राणे बाहेर ठेवावीत.रणजितभैय्या : (लगेच संधी साधत) मीही तेच म्हणतोय. आपापली पादत्राणे उचलावीत. दुसऱ्यांची उचलू नयेत. योगदेव बाबा : नमस्कार मंडळी... मी आज सुरुवातीला तुम्हाला ‘सूर्यनमस्कार’ शिकविणार आहे. सूर्य उजाडताना हे आसन करायचं असतं. मकरंद आबा : (चुळबुळत) असली सकाळ-सकाळी लवकर उठायची आसनं सांगण्यापेक्षा दुसरं काहीतरी बघा गुरूदेव. नाहीतरी रात्री उशिरापर्यंत जागायची सवयच आहे आम्हाला. योगदेव बाबा : ठीकाय. मग आता ‘पद्मासन’ घालून तयार व्हा. आपापले पाय एकमेकांमध्ये अडकले पाहिजेत. बनकरांचे दत्ता : (‘कदमांच्या अवी’कडं बघत) म्हणजे आपल्या ‘मनोमिलना’सारखं. आपण रोज धप्पकन् पडलो तरी हरकत नाही; पण दोन्ही गटांचे पाय एकमेकांमध्ये अडकून राहिलेच पाहिजेत. योगदेव बाबा : आता दीर्घ श्वास घ्या. काहीवेळ तसाच आत ठेवा. नंतर मी पुढचा आदेश देईपर्यंत प्रतीक्षा करा. जानकर : (अस्वस्थ होत) गेली पावणे-दोन वर्षे प्रतीक्षाच करतोय. शपथविधीला आज बोलावतील, उद्या बोलावतील म्हणून... त्यामुळं दीर्घ निश्वास सोडण्याशिवाय दुसरा कोणताच उपाय राहिलेला नाही मला.योगदेव बाबा : हंऽऽ चला ऽऽ श्वास घ्या. श्वास सोडा. मागून रांगेतून कुणीतरी : गुरुदेव... आम्हा मंडळींना फक्त ‘घ्यायचं’ एवढंच ठावूक. बाकी ‘द्या’ किंवा ‘सोडा’ असलं काहीही सांगू नका. योगदेव बाबा : आता यानंतर तुमच्या आवडीचं आसन कोणतं, ते सांगायला सुरुवात करा. बोला राजे... तुम्हाला कोणतं आवडतं? साताऱ्याचे थोरले राजे : (मिस्कीलपणे) मला ‘शीर्षासन’ खूप आवडतं. जगाला उलटं करून बघताना मला खूप मजा वाटते.फलटणचे राजे : (लगेच टोमणा हाणण्याची संधी न सोडता) पण यासाठी स्वत:ला उलटं व्हावं लागतं, हे कोण सांगणार या राजेंना? साताऱ्याचे धाकटे राजे : मला तर ‘सर्वांगासन’ खूप छान वाटतं. या आसनात एकाचवेळी श्वासावर, मेंदूवर, पायावर, हातावर अन् पोटावर लक्ष द्यावं लागतं. मी कसं कारखान्यात बसून सूतगिरणीवर, बँकेत बसून मार्केट कमिटीवर अन् साताऱ्यात बसून जावळीवर लक्ष ठेवतो. अगदी तस्संऽऽ ल्हासुर्णेकर : मला मात्र कोणताही व्यायाम चालतो, फक्त झटपट हवा बरं का.. कारण ‘हुमगावातून ल्हासुर्णेत अन् कोरेगावातून मुंबईत’ असा सुपरफास्ट प्रवास सतत करावा लागतो नां मला! शंभूराज : मी मात्र लगेच सांगणार नाही. माझ्यासमोर बसलेले ‘विक्रमसिंह’ कोणतं आसन करतात, हे पाहून अगदी त्याउलट मी करणार! मग कितीही त्रास होऊ दे मला. विलासकाका : (अतुलबाबांच्या कानात) मी म्हणतो तसंच तुम्हीही व्यायाम करायचा बरं का. नाहीतरी अलीकडं तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट ऐकत चालल्याची बाहेर चर्चा आहेच. ‘मसूर’कर पैलवान : मी मात्र ‘उत्तर’ दिशेला छाती वर करणार अन् ‘दक्षिण’ दिशेला हळूच मान खाली झुकविणार! (सगळेच खदखदून हसू लागतात.) दीपक तरडगावकर : पण ‘पाठदुखी’वर कोणता व्यायाम आहे का हो गुरुदेव? कारण ‘फलटण’मध्ये ‘वाकून-वाकून’ खूप त्रास होतोय बघा. योगदेव बाबा : (शांतपणे वास्तवाची जाणीव करू देत) मग त्यासाठी ‘पाठीचा कणा ताठ’ ठेवायला शिका. कितीही झालं तरी लाखो मंडळींचे ‘लोकप्रतिनिधी’ आहात तुम्ही ! दीपक तरडगावकर : (बावचळून) पण ‘पाठीचा कणा’ म्हणजे काय? पुरुषोत्तम खंडाळाकर : ‘एकाच जागी स्थिर’ होऊन व्यायाम करण्यापेक्षा ‘इकडून तिकडं उड्या’ मारण्याचा प्रयोग करता येणार नाही का आम्हाला? दीपक जावळीकर : (हिरमुसून) हो.. हो... असल्या प्रकारात मी खूप माहीर आहे; पण काय करू?... एवढं करूनही माझं ‘वजन’ काही वाढत नाही रावऽऽ (सारे बोलत असताना ‘पृथ्वीबाबा’ मात्र डोळे मिटून कसल्यातरी वेगळ्याच आसनात तल्लीन झालेले.) योगदेव बाबा : (तंद्री भंग करत) कऱ्हाडकर.. तुमचं काय मत आहे? पृथ्वीबाबा : (खाडकन् डोळे उघडत) माझं मत म्हणता? धनुष्यातून सुटलेला बाण कमळाच्या पाकळ्यांमध्ये घुसणार... अन् पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच ‘मध्यावधी’त आम्ही पुन्हा ‘व्यायाम’ करणार! फलटणचे राजे : (खोचकपणे) आमचे ‘साडू’ गेल्या दीड वर्षांपासून हेच भविष्य करताहेत. दुसरा कोणता मुद्दाच नसावा त्यांच्याकडं. बानुगडे सर : आम्ही ‘भगवे सैनिक’ मात्र ‘अष्टवक्रासन’ करणार. जिल्ह्यातल्या कोणत्याही बारीक-सारीक कामासाठी ‘आठ-आठ वळणं’ पार करून ‘पुरंदर’ला जाण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरेल आम्हाला... कारण ‘विजयबापूं’ना साताऱ्यात येऊन श्वास घ्यायलाही म्हणे वेळ नाही.योगदेव बाबा : (सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर) ठीकाय मंडळी. चला आता.. शेवटचं आसन करू या. पुढं झुका... अन् जमिनीला नाक लावा! (पण हे ऐकताच मात्र प्रचंड गलबला जाहला. शिबिरात गोंधळ माजला. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर अक्षरश: ‘सातारी राडा’ झाला.) मागून आवाज : गुरुदेव... शब्द मागे घ्या! शब्द मागे घ्या!!योगदेव बाबा : (थरथरत) का? काय झालं? फक्त ‘पुढं झुका’ म्हटल्यावर तुम्हा सर्वांना एवढा राग का आला? समोरून कोरस : (एकसुरात) साताऱ्याची नेते मंडळी जीव देतील, पण कुणासमोर कधीच ‘पुढं झुकणार नाहीत!’ लक्षात ठेवा...(शेवटी मॉरल : सातारी नेत्यांचं शिबिर पॅकअप. दुसऱ्या जिल्ह्याकडं गुरुदेवांचं तातडीनं प्रस्थान.) सचिन जवळकोटे