शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

येरळवाडी अन् नेर प्रकल्पाने उन्हाळ्यात मिटविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा पन्नास‌ टक्क्यांवर आहे. त्यामुळे परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. कोरोना महामारी आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

खटाव तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी टिकून असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली जात आहेत. यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा येरळवाडी तलाव आणि तालुक्यातील प्रमुख पाझर तलाव्यात साठून आहे. येरळवाडी तलाव्यावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही. इतका मुबलक पाणीसाठा आहे. येरळवाडी तलावात सध्या पन्नास टक्के पाणीसाठा आहे तर नेर तलाव्यामध्ये ४२.७५ टक्के, मायणी तलाव्यात ५८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पांत चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर खटाव तालुक्यात पिण्याचा पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. शेती पाण्यासाठी उरमोडी व तारळी प्रकल्पातील अतिरिक्त आवर्तंनावर अवलंबून राहावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात दिसून येत आहे. खटाव तालुक्यात पाणी फौंडेशनच्या काम कमी प्रमाणात झाले असले तरी दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत काही मोजक्याच गावांतील ग्रामस्थांनी अगदी आबालवृद्धांसह एकजुटीने श्रमदानातून काम केले होते. गावागावांत श्रमपंढरी फुलली अन्‌ मोठ्या प्रमाणात श्रमदानातून कामे झाली होती. या कामांवर

गतवर्षी निसर्गाने कृपाछत्र धरले आणि सर्व जलस्रोत भरून गेले. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटांवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चाैकट : उरमोडी धरणातून पाण्याचे आर्वतन सुरू

मध्यम प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा होत असून यामध्ये प्रामुख्याने नेर, दरूज, येळीव, सातेवाडी, मायणी व कानकात्रे गावासाठी शेती पाण्यासाठी प्रसंगी उपयोग होतो आहे. खटाव तालुक्यात १६ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत तारळी व उरमोडीचे कॅनाॅलद्वारे पाणी आवर्तन सुरू आहे.‌ उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हे पाणी सलग ठेवण्यासाठी शेतकरीवर्गातून मागणी होऊ शकते.

चाैकट :

सध्याचा पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये

१) नेर - ५.०४,

२) दरूज - १.४०

३) सातेवाडी - ०.४०

४) मायणी - ०.८५

५) कानकात्रे - १.५९

-------------------

फोटो आहे :

फोटो : पावसाळ्यातील येरळवाडी तलावाचे विहंगम दृश्य (शेखर जाधव)