वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील स्वच्छता झाल्यानंतर ओम स्वच्छता ग्रुपच्या कार्यकत्यांनी आणि महसूल पदाधिकाऱ्यांनी पावसाळ्यापुर्वी तालुक्याला जल वरदान ठरणारी येरळा नदी स्वच्छ करण्याचा मानस केला आहे. वडूज येथील येरळा नदीपात्र स्वच्छ करण्याची सुरवात झाली. दरम्यान प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विवेक साळुंके, गटविकास अधिकारी राहुल देसाई, ग्रामविकास अधिकारी चाँदशा काझी, गावकामगार तलाठी अभय शिंंदे आदींसह मान्यवर ग्रामस्थ आणि ओम स्वच्छता ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.ओम स्वच्छता ग्रुपचे कार्यकर्ते आजपर्यंत दर रविवारी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालयाचा परिसर, मंदिर परिसराची स्वच्छता करत होते. याशिवाय ग्रुपच्या वतीने स्वच्छ भारत अभियानात नेहमीच सहकार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या स्वच्छता दुतांचाही गौरव करून समाजामध्ये वेगळा संदेश दिला होता. या विधायक उपक्रमानंतर आता या ग्रुपच्या कार्यकत्यांनी येरळा नदीपात्राची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. वडूज, कऱ्हाड रस्त्यावरील असणाऱ्या येरळा पुलावरील स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर जोतिबा मंदिराचा घाट , तसेच स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रातील बाभळीची झाडे-झुडपे व इतर घनकचऱ्याचे उच्चाटन जेसीबी मशिनच्या सहायाने करण्यात आले. यावेळी स्वेच्छेने मदत करण्यासाठी यंत्रे, जेसीबी देवून विविध क्षेत्रातील नागरिकांनी तसेच युवकांनीही या अभियानामध्ये सहभाग घेतला. (प्रतिनिधी)माणगंगेची सहल येरळेच्या स्वच्छतेसाठी...ओम स्वच्छता ग्रुप व अधिकारी यांनी शुकवार दि. १७ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत अनेक नागरिकांनी श्रमदानातून माणगंगेची केलेली स्वच्छता आणि बांधलेले बंधारे पाहून ही सहल प्रेरणादायी ठरल्याचे मत सदस्यांनी यावेळी व्यक्त केले. यामध्ये सगळ्याचाच सहभाग होता.
येरळा नदी स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात
By admin | Updated: April 20, 2015 00:12 IST