शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

यंदाचा गणेशोत्सव पूरग्रस्तांच्या मदतीसाठी! - सातारकरांनी पुढं येणं महत्त्वाचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 20:39 IST

समाजाताील विविध स्तरांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू असला तरी आपल्या शेजारील या बांधवांना समाजातून अधिक मदतीची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देवाचलेल्या पैशांतून उभारू कोसळलेली घरं अन् संसारसातारकर -साधं साजरीकरण व्हावं।

प्रगती जाधव-पाटीलसातारा : क-हाड-पाटणसह सांगली आणि कोल्हापूरला पुराचा पडलेला विळखा आताशी कुठं सैल झाला आहे. शेजारील जिल्ह्यातील बंधू-भगिनी त्यांच्या आयुष्याची कमाई पाण्यात वाहून गेल्याचं दु:ख घेऊन पुन्हा नव्या हिमतीने आणि जोमाने उभं राहण्याच्या तयारीत असताना आपण उत्सव साजरा करावा, हे संवेदनशील सातारकरांच्या मनाला न पटणारं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून या बांधवांना मदत करण्यासाठी सातारकरांनी पुढं येणं महत्त्वाचं आहे.

गत सप्ताहात सलग दहा दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाने सातारा जिल्ह्यातील कºहाड आणि पाटण तालुक्यांना पुराच्या पाण्याने वेढले होते. अशीच गंभीर परिस्थिती कोल्हापूर आणि सांगलीमध्येही झाल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे कोसळून गेले होते. समाजाताील विविध स्तरांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू असला तरी आपल्या शेजारील या बांधवांना समाजातून अधिक मदतीची आवश्यकता आहे.

ऐतिहासिक साता-याने आजवर प्रत्येक संकटाशी दोन हात करून इतरांनाही मदत केल्याचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तमाम सातारकरांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे. पुरातून सावरणा-या आपल्या भावंडांना त्यांच्या पायावर सक्षम उभं राहण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवातील अतिरिक्त खर्च टाळून ती मदत रुपाने पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन ‘लोकमत’ करत आहे. साताºयातील मंडळांनी अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन त्यातून शिल्लक राहिलेली रक्कम पूरग्रस्त भागातील गावांना देऊन सणांच्या माध्यमातून माणुसकी जोपासावी, अशी अपेक्षा आहे. 

संकटग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर कायम धावून जातात. यंदाचा उत्सवातील खर्च कमी करून तो पूरग्रस्तांकडे देण्याचा ‘लोकमत’च्या वतीने राबविण्यात येणारा उपक्रम स्तुत्य आहे. यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गुरुकुल स्कूलही सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.- राजेंद्र चोरगे, समाजसेवक

उत्सव काळातील खर्च कमी करून पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी बळ देणं अधिक महत्त्वाचं आहे. सातारकर याबाबत संवेदनशीलही आहेत. ‘लोकमत’च्या उपक्रमात सातारकर आणि गणपती मंडळांचा सक्रिय सहभाग मिळेल, यात शंका नाही.- कन्हैय्यालाल राजपुरोहित, व्यावसायिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanpati Festivalगणेशोत्सव