शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बचतगट उत्पादनांचे संमेलनातच व्यापाऱ्यांकडून वर्षाचे बुकिंग; सातारा जिल्हास्तरावर पहिलाच उपक्रम 

By नितीन काळेल | Updated: December 22, 2023 19:08 IST

जिल्हा परिषदेत खरेदीदार-विक्रेता संमेलन

सातारा : उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण बचत गटांच्या उत्पादनांना खात्रीशीर बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेत पहिले जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन झाले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये ६२ विक्रेते गट तर २२ खरेदीदारांनी सहभाग नोंदवला. तर संमेलनातच खरेदीदारांकडून उत्पादनाला ऑर्डर मिळाली हे विशेष.संमेलनाचे उद्घाटन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा अभियान व्यवस्थापक मार्केटिंग सूरज पवार, मनोजकुमार राजे, स्वाती मोरे, संजय निकम आदी उपस्थित होते.प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी घुले म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनासाठी उमेदमार्फत सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. बचत गटांनीही गुणवत्तेबरोबर पॅकेजिंग व लेबलिंगवर भर दिल्यास खात्रीशीर बाजारपेठ मिळण्यास मदत होईल.प्रकल्प संचालक संतोष हराळे म्हणाले, ‘उमेद’च्या माध्यमातून उत्पादन करणारे बचत गट विक्रेते आणि साताऱ्यातील खरेदीदारांना संमेलनाच्या माध्यमातून जोडण्यासाठी दुवा म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा काम करीत आहे. जिल्हास्तरावरील हा पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य ‘उमेद’च्या माध्यमातून करणार आहे.संमेलनात ११ तालुक्यातील दर्जेदार उत्पादन असणाऱ्या ६२ गटांनी विक्रेता म्हणून सहभाग घेतला. तर साताऱ्यातील नामांकित २२ खरेदीदारांनी सहभागी होत विक्रेते गटांबरोबर करार करून ऑर्डरही दिल्या. तांदूळ, गीर गायीचे तूप, नाचणी, इन्स्टंट पीठ, सेंद्रिय गूळ, काकवी, पेढे, लस्सी, कढीपत्ता चटणी, फळे व भाजीपाला, मशरूम बिस्किटे, पंचगव्य उत्पादन, वाघा घेवडा, गांडूळ खत, आवळा कँडी, कागदी कलाकृती, लाकडी घाण्यावरील तेल, मध, मसाले, फिनेल, लोणचे, गुलकंद, मिलेट्स कुकीज, शतावरी, साबण, हळद, नाचणी आदी नावीन्यपूर्ण उत्पादने घेऊन विक्रेते, बचत गट सहभागी झालेले होते. या संमेलनाचे अंकुश मोटे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती मोरे यांनी सूत्रसंचालन तर संजय निकम यांनी आभार मानले.

९ गटांना ११ खरेदीदारांकडून संमेलनातच ऑर्डर..या संमेलनात रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आलेला होता. यामध्ये ९ बचत गटांना खरेदीदारांकडून संमेलनातच ऑर्डर मिळाल्या. तसेच जिल्ह्यातील उमेद संलग्न ११ महिला शेतकरी उत्पादक कंपन्याबरोबर शेती करण्यासाठी दोन कंपन्यांनी करार केले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद