शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

यशवंतराव चव्हाण थोर साहित्यिक

By admin | Updated: November 27, 2015 00:40 IST

सदानंद मोरे : ‘कालिकादेवी’तर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे वितरण

कऱ्हाड : ‘सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य हे या दोन मतप्रवाहात संघर्ष होत राहिले. पण लोकमान्य टिळकांनंतर यशवंतराव चव्हाण यांनी दोन्ही विचारांमध्ये सुवर्णमध्य साधून महाराष्ट्र घडण्यासंदर्भात मतप्रवाह तयार केला. त्यांनी देशपातळीवर राज्याची ओळख निर्माण केली. यशवंतरावांनी सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करत राजकीय स्वातंत्र्यालाही प्राधान्य दिले. यशवंतराव चव्हाण थोर राजकारणी तसेच थोर साहित्यिकही होते,’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.येथील कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डॉ मोरे यांना यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘सामाजिक कृतज्ञता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित होते. यावेळी कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान-सावकार, संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, ज्येष्ठ संचालक बाबूराव सुर्वे, डॉ. संतोष मोहिरे, अरुण जाधव, उपाध्यक्ष राजन वेळापुरे, शाम वेळापुरे, बाळासाहेब मोहिरे, शरदचंद्र देसाई, राजेंद्र साठे, अनिल सोनवले, डॉ. जयंवत सातपुते, राजाभाऊ मंगसुळीकर, सुरेखा मोरे, जयाराणी जाधव, सीमा विभूते, अरुंधती चव्हाण, व्यवस्थापक विवेक वेळापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मोरे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत राज्याचे नेतृत्त्व करताना संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, जोतिबा फुले ही मुख्य प्रतीके मानली. मराठी माणसाला जे हवे आहे ते आत्मसात करत साहित्य, कुस्ती, तमाशा, भजनाशी संगत केली. म्हणूनच ते महाराष्ट्र समजूही शकले आणि बदलूही शकले. नेतृत्त्व करण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत ते त्यांनी इतरांतून स्वीकारले.’ यावेळी मान्यवरांच्या हस्ते रौप्य महोत्सवी सेवेबद्दल संचालक बाळासाहेब मोहिरे, डॉ. संतोष मोहिरे, शाम वेळापुरे, बाबूराव सुर्वे, व्यवस्थापक विवेक वेळापुरे व सेवक सर्जेराव घारे यांचा सत्कार करण्यात आला. सुरेखा मोरे यांचा अरुंधती चव्हाण यांनी सत्कार केला. यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, माजी प्राचार्य व्ही. टी. घारपुरे, प्रा. बी. के. घाटगे, प्रा. शिरीष गोडबोले, मेजर शंकर डांगे, मारूती कुरकुटे, साहित्यिक माणिक बनकर, उपप्राचार्य अशोक अटकर व मान्यवर उपस्थित होते. प्रा. अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मंगसुळीकर यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. संतोष मोहिरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)