शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

वाई कृषी उत्पन बाजार समितीत हळदीला उच्चांकी २९ हजार प्रतीक्विंटल दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 15:02 IST

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद लिलावात मोहन ओसवाल यांच्या काट्यावर बावधन येथील प्रगतशील शेतकरी गणेश विश्वास कदम यांनी कष्टातून पिकविलेल्या हळद या पिकला २९ हजार इतका उच्चांकी दर मिळाला.

ठळक मुद्देवाई कृषी उत्पन बाजार समितीत हळदीला उच्चांकी २९ हजार प्रतीक्विंटल दरहळद उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण

वाई : वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद लिलावात मोहन ओसवाल यांच्या काट्यावर बावधन येथील प्रगतशील शेतकरी गणेश विश्वास कदम यांनी कष्टातून पिकविलेल्या हळद या पिकला २९ हजार इतका उच्चांकी दर मिळाला.

भुईंज येथील शेतकरी संदीप ज्ञानेश्वर भोसले यांच्या हळदीला २५ हजार इतका उच्चांकी दर मिळाला. बाजार समितीत सरासरी दोन हजार पोत्यांची आवक होऊन त्यातील सरासरी दर ९ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. असे उच्चांकी दराने वाई येथे हळदीचे लिलाव झाल्यामुळे वाई तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

वाई तालुका हा सातारा जिल्ह्यामध्ये हळदीचे आगार म्हणून ओळखला जातो. ओझर्डे, पांडे, खानापूर, फुलेनगर, बावधन, भुईंज, शिरगाव, कवठे, व्याजवाडी येथील प्रगतशील शेतकरी पिढ्यानपिढ्या हळद पिकांचा वाण जपण्यासाठी प्रसंगी सोसायटी, खासगी सावकार व हातउसने व घरातील दागिने गहाण ठेवून हजारो रुपयांचे शेणखत व हळद पिक उत्पादनासाठी इतर एकरी ४० हजाराच्या रुपयांच्या आसपास खर्च करीत असतात.

त्याचबरोबर शेतीची मशागत, रासायनिक खत व उत्तम प्रतीची बियाणे मिळविण्यासाठी असा लाखो रुपये खर्च करून स्पर्धात्मक हळदीचे पिक घेताना दिसून येतात पण गेल्या पाच ते सहा वर्षापासून राज्यातील सर्वच बाजार समितींच्या काट्यावर क्विंटलला ४ ते ५ हजार रुपये दर प्राप्त होत होता.त्यावेळी शेतकरी नाराज होऊन कवडीमोल दराने आपल्या हळदीची विक्री करीत होता. पण आजपर्यंत हळद शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतानाही शेतकऱ्यांनी हळदीचा बिवड जपून ठेवल्याने त्याला ९ हजार रुपयांपासून २९ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू लागला.

यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. तरी वाई तालुक्यासह परिसरातील तालुक्यातील शेतकऱ्यांनी हळद पिकाला जादा दर मिळविण्यासाठी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा व शेतकऱ्याने जास्तीत जास्त दर आपल्या पदरात पाडून घ्यावा असे आवाहन वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती व सर्व संचालकांनी केले आहे़.

टॅग्स :wai-acवाईMarketबाजारSatara areaसातारा परिसर