शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

दिव्यंगत्वावर मात करून सावरला संसार; गाडे दाम्पत्याची संघर्षमय कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:11 IST

सातारा : दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास असेल तर दिव्यांग मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. ही गोष्ट सुभाषित कोंडवे ...

सातारा : दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास असेल तर दिव्यांग मनुष्यदेखील पर्वत ओलांडून जाऊ शकतो. ही गोष्ट सुभाषित कोंडवे येथील अपंग रवींद्र गाडे व मंदाकिनी गाडे या दाम्पत्याने साध्य करून दाखविली आहे. दिव्यंगत्वावर मात करून रवींद्र गाडे यांनी स्वत:चा व्यवसाय व मंदाकिनी गाडे यांची संगणक परिचालिका म्हणून नोकरी करत जीवनाची वाटचाल सुरू केली आहे.रवींद्र यांना बालपणात वयाच्या बाराव्या वर्षी स्पाँडिलायझरग्रस्त आजार झाला. त्यामुळे त्यांच्या खुब्यातील स्नायू जखडले गेल्याने त्यांना आपल्या पायावर उभे राहता येत नाही. त्यासाठी त्यांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागतो. गरिबीमुळे त्यांच्यावर कोणतेही उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना दोन्ही पायाने कायमचे अपंगत्व आले. तरीही गाडे यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दिव्यांग असल्याने खचून न जाता रवींद्र यांनी इलेक्ट्रिकचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन टेक्निकल शिक्षणला सुरुवात केली.त्यानंतर काही वर्षे समर्थ मंदिर येथील गजानन जाधव यांच्या दुकानात इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीचा सराव केला. काहीतरी वेगळे करण्याची उमेद रवींद्र गाडे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दरम्यान, कुटुंबीयांच्या मदतीने त्यांनी कोडंवे येथे इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांच्याकडून लोक काम करून घेण्यास तयार नव्हते. त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहत होते. मात्र, गाडे यांनी आपल्या कामात दाखवलेली गुणवत्ता आणि सातत्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. कष्ट करण्याची प्रवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास यामुळे व्यवसायाबरोबर त्यांचे उत्पन्न वाढू लागले.त्यांनी स्वत:च्या लग्नासाठी मुली बघण्यास सुरुवात केली. दिव्यांग असल्याने अनेकांनी त्यांना नकार दिला. दरम्यान, उस्मानाबाद येथील मंदाकिनी यांचे स्थळ चालून आले. मंदाकिनी यांना ही लहानपणापासून अस्थिव्यंगामुळे अपंगत्व आले. दोघांनी लग्नानंतर आपल्या संसाराला सुरुवात केली. सुरुवातीला दोघांना काही समस्यांना तोंड द्यावे लागले. मंदाकिनी उच्चशिक्षित असल्याने कोंडवे ग्रामपंचायतीमध्ये त्यांना संगणक परिचालिकेची नोकरी चालून आली. ती मंदाकिनी यांनी स्वीकारली. गाडे दाम्पत्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुबड्यांची आवश्यकता असते. मात्र, जीवनाच्या लढाईत दोघे एकमेकांचा हात धरून समर्थपणे वाटचाल करीत आहेत.समाजात स्वत:ची ओळख निर्माण केलीरवींद्र गाडे यांनी अपंगत्वावर मात करून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. उत्पन्न वाढीसोबत त्यांनी समाजात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांचे लग्न करण्याची वेळ आली. तेव्हा त्यांना मुलगी देण्यास कोणी तयार नव्हते. अनेकांनी त्यांच्या कर्तृत्व आणि जिद्दीचे कौतुक आणि हेवा केला. मात्र, मुलगी देण्यास तयार नव्हते. मात्र, उस्मानाबाद येथील मंदाकिनी यांच्या वडिलांनी विश्वास दाखवून आपल्या मुलीशी रवींद्र यांचा विवाह लावून दिला.