कºहाड : कडेगाव येथील केन अॅग्रो साखर कारखान्यात रसायनाची टाकी साफ करताना सात कामगार गुदमरले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने संबंधित कामगारांना उपचारार्थ कºहाड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहन विलास घाडगे (वय ३०, रा. रायगाव, ता. कडेगाव), दिग्विजय उत्तम गरूड (३० रा. कडेगाव), आनंद प्रकाश जगदाळे (२८, रा. राजाचे कुर्ले), दीपक तातोबा पवार (२८, रायगाव), बापुसाहेब मोहन शिंदे (३२, रा. चिखली, ता. कडेगाव), अर्जुन रघुनाथ मोहिते (रा. सोहोली, ता. कडेगाव) व प्रकाश शामराव कदम (२८, रा. नेर्ले, ता. वाळवा) अशी रूग्णालयात उपचार घेणार्या कामगारांची नावे आहेत.घटनास्थळ व रूग्णालय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कडेगाव येथील केन अॅग्रो साखर कारखान्यात शनिवारी रसायनाची टाकी साफ करण्याचे काम सुरू होते. कारखान्यातील काही कामगार टाकी साफ करीत असताना रसायनाच्या उग्र वासामुळे ते गुदमरले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे संबंधित कामगार तातडीने टाकीतून बाहेर पडले. त्यांना तातडीने कºहाडला आणले. (प्रतिनिधी)
रसायनाची टाकी साफ करताना कामगार गुदमरले
By admin | Updated: June 1, 2014 00:58 IST