शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे : रामराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:24 IST

साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, असा टोला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजेंना लगावला, तसेच दहा वर्षे दिल्लीत राहून काम करण्याची चांगली संधी त्यांनी सोडल्याची खंत वाटते, अशा शब्दांतही त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

ठळक मुद्देसाताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी लगावला उदयनराजेंना टोला

सातारा : साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, असा टोला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजेंना लगावला, तसेच दहा वर्षे दिल्लीत राहून काम करण्याची चांगली संधी त्यांनी सोडल्याची खंत वाटते, अशा शब्दांतही त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.जिल्हा मध्यवर्ती बँंकेत झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर विश्रामगृहावर मोजक्या पत्रकारांशी बोलताना रामराजेंनी हे वक्तव्य केले. लोकसभेसाठी मलाच उमेदवारी मिळणार, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी कऱ्हाडयेथे व्यक्त केले होते. त्या वक्तव्याचा रामराजेंनी समाचार घेतला.लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची, ते पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार ठरवतील. अद्याप कोणाचेही नाव फायनल झाले नाही. दिल्लीला आम्हालाही जाता येते, अशी टिप्पणी रामराजेंनी केली. रामराजे म्हणाले, आम्ही जिल्ह्यात नसल्यामुळे अनेकांच्या कॉलर वर होतात.

साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली, याची शरद पवारांकडून आम्ही माहिती घेऊ शकतो. आम्ही दुसरे कोणाला नाही, केवळ शरद पवारांशी बांधील आहोत. कोणी किती विरोध केला तरी माझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल आहे.गल्लीतील गोंधळापेक्षा मी दिल्लीतील निर्णयाला महत्त्व देतो, या उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता रामराजे म्हणाले, पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय स्वत: खासदार शरद पवार घेतील. त्यांच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत.कर्नाटक राज्यातील निकालानंतर खासदार शरद पवार राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतील. त्यांच्याप्रमाणे दिल्लीला आम्हालाही जाता येते. जिल्ह्यात आम्ही नसलो की अनेकांच्या कॉलर उडतात, असे विधान करत उदयनराजेंचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.दरम्यान, पक्षाची उमेदवारी कोणाला?, हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला असता राष्ट्रवादीतून मानकुमरे इच्छुक आहेत, असे त्यांनी सांगितले. मानकुमरे यांनीही आपण तयार आहे. अद्यापही शरद पवार यांनी उमेदवारी संदर्भात आमच्याशी चर्चा केलेली नाही. ते जो उमेदवार देतील, त्याचे सूचक आणि अनुमोदक व्हायला आम्ही तयार आहोत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेPoliticsराजकारण