कोपर्डे हवेली : सद्गुरू गाडगे महाराज काॅलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्राध्यापक, विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाविषयी मार्गदर्शन करत असून, पाच गावांची निवड केली आहे. यामध्ये सैदापूर, गोवारे, कोपर्डे हवेली, पार्ले, बनवडी या पाच गावांचा सामावेश आहे.
कोपर्डे हवेली गावात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. तानाजी पाटील, प्रा. किशोरी वंदना, प्रा. डॉ. कोमल कुंदप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, काॅ. गणेश चव्हाण, पोपट चव्हाण, माजी मुख्याध्यापक रघुनाथ चव्हाण, जयंत पाटील, महादेव चव्हाण, लहू पवार, एनएसएसचे विद्यार्थी साक्षी कुंभार, हेमांगी कुलकर्णी, ओंकार पाटील उपस्थित होते.
प्रा. डॉ. कोमल कुंदप म्हणाल्या, ‘कोरोनाबाधित म्हटले की, लोक निगेटिव्ह होतात. त्यासाठी कोरोनाची भीती डोक्यातून काढली पाहिजे. प्रत्येकाने त्याची काळजी घेत त्याच्यावर मात केली पाहिजे. कोरोनाचा रुग्ण सापडू नये, यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत काम केले पाहिजे. कोरोनाच्या विषाणूला आत्मविश्वासाने मारले पाहिजे.’
यावेळी प्रा. डॉ. तानाजी पाटील म्हणाले,
प्रा. किशोरी वंदना यांनी मार्गदर्शन केले. काॅ. गणेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी आभार मानले.