शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

शब्दसुरांची आगळी

By admin | Updated: December 1, 2014 00:21 IST

सखींनी दिली दाद : संगीत रंगभूमीच्या अजरामर योगदानाची झाली आठवण

सातारा : महाराष्ट्रात रुजलेल्या संगीत रंगभूमीला विद्याधर गोखले, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज यांच्या सिद्धहस्त लेखणीची किनार लाभली. अनेकांची लेखणी अजरामर झाली. या अजरामर नाट्यसंगीतील शब्दसुरांची आगळी मैफल शाहू कला मंदिरमध्ये साजरी झाली. या मैफलीतून संगीत रंगभूमीसाठी अजरामर योगदान देणाऱ्या परीसतूल्य व्यक्तिमत्त्वांना मानवंदना वाहण्यात आली. निमित्त होतं ‘लोकमत सखी मंच’तर्फे आयोजित ‘मानवंदना’ या कार्यक्रमाचं!शाहू कला मंदिरमध्ये आयोजित केलेल्या या श्रवणीय कार्यक्रमाला प्रकृती हेल्थ रिसॉर्ट, जिजाऊ प्रतिष्ठान व जोशी हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी, कल्याणी जोशी, गौतम मुरुडेश्वर, प्रदीप पटवर्धन, विजय गोखले यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थित सखींच्या मनाचा ठाव घेतला. मराठी कवी, नाटककार, लेखक यांनी सांस्कृतिक, मनोरंजन व साहित्य क्षेत्रात दिलेलं योगदान कृतज्ञपणे व्यक्त करण्याचा ‘मानवंदना’चा हा प्रयत्न सातारकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. या कलाकारांनी ‘पुण्यप्रभा, भावबंधन, एकच प्याला’ या नाटकांतील प्रसंग सादर केले. या प्रसंगानुरूप केले गेलेले भाष्य विशेष उल्लेखनीय ठरले. आम्ही सादर करत आहोत ती गप्पांमधील गाणी आहेत, असं विघ्नेश जोशींनी सांगितलं. सादरीकरणाचा हा आगळा प्रकार मात्र सखींना चांगलाच भावला. एखाद्या प्रसंगातील संवादावर हास्याचे फवारे फुलत होते. तर आपल्या संसारात पती-पत्नीच्या नात्याला किती महत्त्व आहे, हेही पटवून दिले. कवी कुसुमाग्रजांचे ‘गरजा जयजयकार...क्रांतीचा गरजा जयजयकार’ या गीताने क्रांतीचे बळ चेतवले. तर ‘हसरा-नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला’ या गाण्याने मार्गशिर्षातही श्रावणाचा आनंद मिळवून दिला. कवी मंगेश पाडगावकरांच्या ‘माझे जीवन गाणे...’या गीताने रसिकतेची भावना आणखी गडद केली. ‘इथे ओशाळला मृत्यू’ आणि ‘एकच प्याला’ या दोन नाटकातील विचार करायला लावणारे प्रसंगही यावेळी सादर झाले. (प्रतिनिधी) सुनीता जाधव सुवर्ण नथीच्या विजेत्यामानवंदना कार्यक्रमावेळी जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार व लाहोटी कलेक्शनच्या किरण लाहोटी यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. सुनीता विलास जाधव या सुवर्ण नथीच्या मानकरी ठरल्या.