शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात रणरागिणींचा एल्गार, साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा

By सचिन काकडे | Updated: November 3, 2023 19:02 IST

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी ...

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव पुढे सरसावले असताना आता महिलांनी देखील आरक्षणासाठी वज्रमुठ आवळली आहे. साताऱ्यातील रणरागिनींनी शुक्रवारी सायंकाळी दुचाकी रॅली काढून साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी देण्यात आलेल्या ‘एक मराठा..लाख मराठा’ या घोषणेने शहर दणाणून गेले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू केलेले उपोषण स्थगित केले असले तरी साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साताऱ्यातही दहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण सुरू आहे.या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शुक्रवारी महिलांकडून दुचाकी रॅली काढण्यात आली. सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून या रॅलीस प्रारंभ झाला. दुचाकीला लावलेले भगवे झेंडे, भगव्या टोप्या व फेटे परिधान करून रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी ‘एक मराठा.. लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी.. जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कोणाच्या बापाच्या’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.ही रॅली पोवई नाक्यावरुन शाहू चौक मार्गे राजपथाकडे मार्गस्थ झाली. यानंतर गोलबाग, मोतीचौक, ५०१ पाटी, पोलिस मुख्यालय मार्ग, शिवतीर्थ येथून उपोषणस्थळी आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप झाला. शंभरहून अधिक महिलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.

आदेश येईपर्यंत माघार नाही..सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. शुक्रवारी सकाळी कोडोलीसह परिसरातील गावांनी या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला. वरून आदेश येईपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती, आंदोलकांकडून देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणWomenमहिला