कुंभारगाव, ता. पाटण येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुंभारगावमध्ये सत्तांतर झाले. योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीने अकरापैकी सात जागा जिंकून सत्ता काबीज केली. निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य राजेंद्र चव्हाण, हनुमंत कांबळे, धनाजी बोरगे, सारिका पाटणकर, शीतल बुरशे, वैशाली गुरव, विमल शिबे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मनीषा मोरे, राजेंद्र माने, अनिल गायकवाड, राजेंद्र देसाई, प्रदीप देसाई, अजित डांगे, जयवंत पाटील, संजय गुरव, स्वप्नील माने उपस्थित होते.
फोटो : २९केआरडी०४
कॅप्शन : कुंभारगाव, ता. पाटण येथे शेंडेवाडीच्या सरपंच विद्याताई मोरे यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.