शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

ओढ्याच्या पुरात महिला गेली वाहून, मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:50 IST

वेळे कामथी, ता. सातारा येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देओढ्याच्या पुरात महिला गेली वाहून, मृतदेह सापडला शेतातून परत येताना दुर्घटना

किडगाव : वेळे कामथी, ता. सातारा येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी, शेतामध्ये भातलागण करून लता चव्हाण या अन्य महिलांसह घरी येत होत्या. तीन महिला एकमेकींचा हात धरून पुरातून वाट काढत हळूहळू पुढे जात होत्या. मात्र, चव्हाण यांचा अचानक हात सुटला. त्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता रात्री सव्वासात वाजता खडकजाई ओढा परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.गेल्या चार दिवसांपासून वेळे कामठी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे ओढ्यांना पूर आला आहे. चव्हाण यांच्या पश्चात मुलगा नामदेव चव्हाण हे एकुलते एक असून ते दिव्यांग आहेत.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर