शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:28 IST

खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देचहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचारखंडाळा तालुक्यातील घटना: आरोपीला अटक

सातारा : खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.गुलाबराव खाशाबा निगडे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील एका गावात संबंधित महिला वास्तव्यास असून, तिच्या पतीचे नुकतेच जून महिन्यामध्ये अपघाती निधन झाले आहे. संबंधित महिला एका अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी संबंधित पीडित महिला साफसफाई व बेन्टेक्स धातूचे दागिने विकण्याचे काम करत होती.दरम्यान, १२ जुलै रोजी गुलाबराव निगडे याने संबंधित महिलेला माझ्या मित्राच्या घराची साफसफाई करायची आहे,असे सांगून मित्राच्या घरी बोलावून घेतले. यावेळी गुलाबराव निगडे याने संबंधित महिलेला त्याठिकाणी चहा घेण्यास सांगितले. महिलेने चहा पिल्यानंतर चक्कर यायला लागली. मला चक्कर येत असल्याचे महिलेने सांगताच गुलाबराव निगडे याने तू पावसातून आली असल्याने थकवा जाणवत असेल, असे सांगितले. त्यानंतर निगडे याने महिलेला मारहाण करत जबरदस्तीने अत्याचार केला.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसांनी गुलाबराव निगडे याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन निगडेला अटक केली. खंडाळा न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे ,पोलीस हवालदार अमोल जगदाळे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर