शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:00 IST

Doctor Satara Bamnoli- आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्ण नसतानाही शिवाय वादळी वारे व पाण्यातून रात्रीचा प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आदर्श प्रामाणिक डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून यशस्वी प्रसूती केली. याबद्दल मोरे डॉक्टरांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ठळक मुद्देवादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर धावले मदतीला

लक्ष्मण गोरेबामणोली : आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्ण नसतानाही शिवाय वादळी वारे व पाण्यातून रात्रीचा प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आदर्श प्रामाणिक डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून यशस्वी प्रसूती केली. याबद्दल मोरे डॉक्टरांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बामणोली व तापोळा हा परिसर येथील निसर्गसंपदेने नटलेला. परिसरातील अनेक गावे कडेकपाऱ्यात वसलेली. गावे व वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आजही साध्या कच्च्या रस्त्याचीही सोय नाही. दुसरीकडे शिवसागर जलाशयापलीकडे असणाऱ्या कांदाटी, सोळशी व कोयना अशा तीन खोऱ्यातील लोकांचे दळणवळण तर पूर्णपणे पाण्यातूनच होत आहे. वादळी वारे, अतिवृष्टी अशावेळी येथील जीवनचक्र पूर्णपणे ठप्प होते. गरोदर स्त्रिया व वृद्ध आजारी पेशंट यांना आजही डोलीतूनच पक्क्या रस्त्यापर्यंत पोहचवावे लागते. रविवारी अशीच एक थरारक घटना शिवसागर जलाशयाच्या कांदाटी खोऱ्यात घडली .रविवारी दिवस रात्र बामणोली तापोळा परिसरात वादळी वारे वाहत होते. त्यामुळे पाण्यातून लाँच चालविणे कठीण होते. पिंपरी तांब या गावच्या एकता जाधव या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. रात्रीच्या १ वाजता गावकरी लॉंचेतून तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे या महिलेला नेऊ लागले, कारण सदर महिलेचे गाव तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते.

बामणोलीच्या जवळ आल्यावर लाँच वाऱ्यामुळे चालविता येत नव्हती. तेव्हा काही ग्रामस्थांनी बामणोलीच्या डॉक्टर मोरेंना फोन केला. त्यांनी झोपेतून उठून व सोबत पवार व पाडवी या नर्सना घेऊन रात्री दीड वाजता दोन कि.मी. चालत नदीकिनारी पोहोचले. रुग्णाची लाँच वाऱ्यामुळे किनाऱ्यावर पोहोचत नसल्यामुळे मोरे डॉक्टरांनी बामणोली बोट क्लबची एक लाँच घेऊन त्या लाँचेपर्यंत पोहचून पाण्यातच त्या महिलेची यशस्वीपणे प्रसूती केली.

" मी कायमस्वरूपी निवासी बामणोली आरोग्य केंद्रात सहकुटुंब असतो. रविवार असल्यामुळे मी जेवण करून झोपी गेलो होतो. रात्री १ वाजता अचानक फोन आल्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता निवासी असणाऱ्या पवार व पाडवी या दोन नर्सना घेऊन वादळी वाऱ्यातून दुसऱ्या लाँचेतून पोहोचून सदर महिलेची यशस्वी प्रसूती केली."डॉ. ज्ञानेश्वर मोरे,प्राथमिक आरोग्य केंद्र. बामणोली

" रात्रीच्या वेळी माझ्या नाती ला प्रसूती वेदना सुरू झाल्या. वादळी वारे वाहत होते अशा वेळी काय करावे सूचत नव्हते. डॉक्टर ज्ञानेश्वर मोरे देवासारखे स्वतःचा जीव धोक्यात घालून धावून आले व त्यांनी माझ्या नातीला वाचविले. त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.-श्रीमती जाधव, रुग्णाची आजी

टॅग्स :docterडॉक्टरSatara areaसातारा परिसरKas Patharकास पठार