शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:23 IST

कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळविल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शाहूपुरी परिसरात घडली.

ठळक मुद्देमहिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवलीसीसीटीव्हीत घटना कैद : पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळविल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शाहूपुरी परिसरात घडली.याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरीतील रत्नमणी सोसायटीमध्ये राहणाऱ्या विना उपचंद बाफना (वय ४५) या बुधवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच ११ बीक्यू ७७४९) राजवाड्याकडे येत होत्या. यावेळी पिवळा टी शर्ट परिधान केलेल्या एका युवकाने त्यांची दुचाकी अडवली.

बोलण्याचा बहाणा करून त्याने काही क्षणातच खिशातील चाकू बाहेर काढला. त्यांना धमकावत दुचाकी घेऊन त्याने पलायन केले. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या बाफना या त्याच रस्त्याने माघारी पळत गेल्या. यानंतर त्यांनी याची माहिती घरातल्यांना दिली.

शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले.

पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली असून, शहर व परिसरात चोरट्याचा शोध घेतला जात आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर