शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, हाताला पडले २५ टाके; कोरेगाव तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:30 IST

कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील पिराचे शेत नावाच्या शिवारात ही घटना घडली

रहिमतपूर : शिवारात वाला घेवड्याच्या शेंगा तोडणाऱ्या महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात डुकराचे दात लागल्याने महिला जखमी झाली. मंगल अरुण पवार (वय ४५, रा. पवारवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. पवार यांच्या हातांना मोठी जखम झाल्याने तब्बल २५ टाके पडले आहेत. कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील पिराचे शेत नावाच्या शिवारात ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, मंगल पवार या काल, गुरूवारी सायंकाळी लहान मुलगी साक्षी हिला घेऊन भाजीपाला आणण्यासाठी पिराचे शेत नावाच्या शिवारातील शेतात गेल्या होत्या. साक्षीला बोरीच्या झाडाखाली बसवून साडेचारच्या सुमारास मंगल पवार या वालघेवड्याच्या शेंगा तोडत होत्या. त्याच वेळी पाठीमागून रानडुक्कर अचानक अंगावर धावून आले. 

रानडुकराला प्रतिकार करताना दात लागून मंगल पवार यांच्या दोन्ही हातांना खोलवर जखमा झाल्या. यानंतर रानडुकराने शेतातून धूम ठोकली. रानडुकराने आईवर हल्ला केल्याचे पाहून साक्षी रडू लागली. याबाबत तिने भावाला मोबाइलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली.ग्रामस्थांनी जखमी पवार यांना रहिमतपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रानडुकराच्या दाताने पवार यांच्या दोन्ही हातांवर गंभीर जखमा झाल्याने एका हाताला अठरा व दुसऱ्या हाताला सात टाके पडले आहेत.घटनेचे गांभीर्य ओळखून रहिमतपूर येथील वनपाल अनिल देशमुख, वनरक्षक संतोष काळे व सूर्यकांत ठोंबरे यांच्यासह हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जखमी मंगल पवार यांची व उपस्थित असलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस केली. जखमी पवार यांना शासकीय नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्याबाबतच्या सूचना वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी वनपाल देशमुख यांना दिल्या आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर