सणबूर (जि. सातारा) : शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने काम करत असलेल्या महिलेवर अचानक हल्ला केला. यामध्ये संबंधित शेतकरी महिलेच्या हाताला जखम झाली आहे. तिच्यावर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालन भालेकर (वय. ६५) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भालेकरवाडी बनपुरी, ता. पाटण येथे घडली.मालन भालेकर या मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या शिवारात काम करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत केली. महिलेच्या आरडाओरडीमुळे आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला.
या घटनेमुळे परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पहाटे आणि सायंकाळी शेतात जाणे धोक्याचे बनले आहे.
Web Summary : A leopard attacked a 65-year-old woman working in a field in Satara. The woman sustained hand injuries and is receiving treatment. The incident has created panic in the area due to frequent leopard sightings.
Web Summary : सतारा में खेत में काम कर रही 65 वर्षीय महिला पर तेंदुए ने हमला कर दिया। महिला को हाथ में चोटें आई हैं और उसका इलाज चल रहा है। तेंदुए के बार-बार दिखने से इलाके में दहशत का माहौल है।