शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: मिसाळवस्तीत लांडग्यांनी नऊ शेळ्यांचा पाडला फडशा, नुकसानभरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 16:28 IST

शेळ्यांच्या वाडग्याभोवती लावलेल्या लोखंडी जाळीखालून खड्डा उकरून लांडग्यांनी हल्ला चढवला. यात सहा शेळ्या जागेवरच फस्त केल्या.

वरकुटे-मलवडी : कुरणेवाडी, ता. माण येथील मिसाळ वस्ती येथे राहणाऱ्या दगडू आबाजी मिसाळ या मेंढपाळाच्या सहा शेळ्या आणि तीन बोकडं मिळून नऊ शेळ्यांचा लांडग्याने फडशा पाडला असून, दोन शेळ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये हातावर पोट असणाऱ्या मेंढपाळाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याने कुरणेवाडीसह वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल, बुधवारी (दि.२९) रात्री दीड ते दोनच्या सुमारास रिमझिम पाऊस पडत असल्याने दगडू मिसाळ आपल्या कुटुंबासह घरात झोपले होते. काळाकुट्ट अंधारामुळे झालेली सामसुम आणि रिमझिम पावसाचा फायदा घेत घराशेजारी असलेल्या शेळ्यांच्या वाडग्यावर चार-पाच लांडग्यांनी हल्ला केला. शेळ्यांच्या वाडग्याभोवती लावलेल्या लोखंडी जाळीखालून खड्डा उकरून लांडग्यांनी हल्ला चढवला. यात सहा शेळ्या जागेवरच फस्त केल्या, तर तीन बोकडं घेऊन काही लांडगे पसार झाले. दोन शेळ्यांच्या मानेसह पोटाचे लचके तोडल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात असणारे मेंढपाळ धास्तावले आहेत.या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी गणेश म्हेत्रे यांच्यासह वरकुटे-मलवडी येथील पशुवैद्यकीय पशुधन पर्यवेक्षक नितीन कार्तिक स्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर वनखात्यातील देवापूर विभागाचे वनरक्षक हनुमंत बालटे यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा व नुकसानीची माहिती घेऊन या घटनेचा अहवाल वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.अचानक घडलेल्या घटनेने परिसरात राहणाऱ्या शेतकरी बांधवांकडून हळहळ व्यक्त होत आहे, तर काबाडकष्ट करीत शेळीपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या मेंढपाळास दीड लाख रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी कुरणेवाडीचे सरपंच उमेश आटपाडकर यांनी केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर