शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्ता न सांगितल्याने चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली, शाळकरी मुलगा भाजून जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 19:37 IST

अपूर्वला तेजस ढाबा कोठे आहे, असे विचारले असता त्याने त्या अनोळखी युवकांना मला माहिती नाही, असे सांगितले. याचा राग येऊन गाडीतील एका युवकाने अपूर्व याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकले.

सातारा : तेजस ढाबा कुठे आहे, हे मला माहिती नाही, असे सांगताच कारमधील चार युवकांपैकी एका युवकाने १३ वर्षांच्या शाळकरी मुलाच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली. यामध्ये त्या मुलाचा चेहरा भाजून तो जखमी झाला. अपूर्व जाधव (वय १३, रा. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा) असे या जखमी मुलाचे नाव आहे.या प्रकरानंतर संबंधित मुले तेथून पसार झाली. ही खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील उरमोडी धरणानजिक  काल, रविवारी (दि.२) दुपारच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अपूर्व जाधव हा रविवारी दुपारी गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. यावेळी एक पांढऱ्या रंगाची कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्या कारमध्ये चार युवक होते. त्यांनी अपूर्वला तेजस ढाबा कोठे आहे, असे विचारले असता त्याने त्या अनोळखी युवकांना मला माहिती नाही, असे सांगितले. याचा राग येऊन गाडीतील एका युवकाने अपूर्व याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकले. त्यानंतर काडी पेटवून त्याच्या चेहऱ्यावर टाकली. या प्रकारानंतरसंबंधित मुले तेथून पसार झाली. या प्रकाराची माहिती अपूर्वने घरी जाऊन सांगितल्यानंतर त्याला घेऊन घरातले लोक सातारा तालुका पोलीस ठाण्यात आले. अपूर्ववर प्राथमिक उपचार केल्यानंतर दिनकर बाजीराम जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सातारा तालुका पोलीस या कारचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक तपास हवालदार यादव हे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी