शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेकडील थंड वाऱ्याने साताऱ्यात गारठा, शेकोट्या पेटू लागल्या

By नितीन काळेल | Updated: December 22, 2023 13:42 IST

मागीलवर्षीपेक्षा थंडी कमीच

सातारा : उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने जिल्हाही गारठला आहे. त्यामुळे लोकांच्या अंगातून स्वेटर निघेना अशी स्थिती आहे. तर साताऱ्याचा पारा १५ अंशावर कायम आहे.जिल्ह्यात यावर्षी थंडीला उशिरा सुरूवात झाली. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सुरू झालेली थंडी वाढत गेली. त्यानंतर थंडीत उतार आला. तरीही मागील १२ दिवसांपासून जिल्हावासीयांना चांगलीच थंडी जाणवत आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून किमान तापामानात वाढ झाली असलीतरी उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. यामुळे हवेत गारठा कायम राहत आहे. परिणामी दिवसभर अंगातून थंडी जाईना अशी स्थिती आहे. परिणामी शहरातील नागरिकांना ऊबदार कपडे परिधान करुनच बाहेर पडावे लागत आहे.सातारा शहरातही गारठा कायम आहे. शहराचा पारा १५ अंशावर आहे. शुक्रवारी १५.३ अंशाची नोंद झाली. तर मागील आठवड्यात १३.२ अंशापर्यंत पारा घसरला होता. यावर्षातील हे नीच्चांकी तापमान ठरले. यामुळे लोकांना चांगलीच हुडहुडी भरुन राहिली. त्यानंतर पारा वाढून १८ अंशावर पोहोचला होता. तर थंड हवेच्या महाबळेश्वरलाही थंडी कायम आहे. शुक्रवारी पारा १६ अंशापर्यंत पोहोचला होता. त्यातच थंडगार वारे वाहत असल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. या थंडीचा आनंद पर्यटक घेत आहेत. तर सायंकाळच्या सुमारास शहरातील बाजारपेठेत पर्यटकांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे.दरम्यान, या थंडीचा परिणाम ग्रामीण भागात चांगलाच जाणवत आहे. कारण, पहाटेपासून गारठा वाढत आहे. यामुळे सकाळी नऊपर्यंत थंडी जाणवत आहे. परिणामी शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग तर दुपारच्या सुमारास शेतीची कामे करत आहे. या थंडीचा फायदा पिकांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे. असे असलेतरी यावर्षी मागीलवर्षीपेक्षा थंडी कमी असल्याचे दिसत आहे.

सातारा शहरातील किमान तापमान असे :दि. १० डिसेंर १७.५, ११ डिसेंबर १७, १२ डिसेंबर १७.४, १३ डिसेंबर १५.४, १४ डिसेंबर १५.३, १५ डिसेंबर १३.२, दि. १६ डिसेंबर १३.५, १७ डिसेंबर १८.५, १८ डिसेंबर १६.५, १९ डिसेंबर १५.१, २० डिसेंबर १५.१, २१ डिसेंबर १६.६ आणि दि. २२ डिसेंबर १५.३

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान