वाइन शॉपचालकाच्या बोलेरोची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST2021-01-17T04:34:34+5:302021-01-17T04:34:34+5:30

सातारा : येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर मोकळ्या जागेत लावलेली एका वाइन शॉपचालकाची दीड लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप बनावट चावीचा ...

Wine shop owner's bolero stolen | वाइन शॉपचालकाच्या बोलेरोची चोरी

वाइन शॉपचालकाच्या बोलेरोची चोरी

सातारा : येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर मोकळ्या जागेत लावलेली एका वाइन शॉपचालकाची दीड लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप बनावट चावीचा वापर करून चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अनोखळी चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

गिरीश सुरेशलाल उदासी (वय ३३, रा. व्यंकटेश कॉलनी, गोळीबार मैदान, सातारा) यांचा वाइन शॉपचा व्यवसाय आहे. त्यांनी सोमवार, दि. ११ रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांची बोलेरो पिकअप (एमएच ११ - एजी ४७१८) वनविभागाच्या कार्यालयासमोर असणाऱ्या पी. डी. वासन शॉपशेजारील मोकळ्या जागेत पार्क केली होती. दरम्यान, दि. १२ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तेथे बोलेरो पिकअप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी परिसरात याची शोधाशोध केली असता ती आढळून आली नाही. यानंतर त्यांनी शुक्रवार, दि. १५ रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर हे करत आहेत.

Web Title: Wine shop owner's bolero stolen