शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

निवडणुकीत गुंतलेले नेते दुष्काळाकडे पाहणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 22:18 IST

खटाव - माणमध्ये १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाणी

शेखर जाधव/वडूज : खटाव - माण तालुक्यातील जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण कमतरता जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत पेयजल टंचाई निवारणार्थ १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाण्याचे वाटप सुरु आहे. तर टँकर व गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाला पाणी उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे महाकठीण बनत आहे. पण, निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या नेत्यांना या परिस्थितीकडे पाहण्यास वेळ नाही.

अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे खटाव - माण तालुक्यात यावर्षी पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची चणचण प्रामुख्याने जाणवू लागली आहे. त्यातच सद्यस्थितीत उरमोडी, जिहे-कटापूर व तारळी पाणी साठ्याचे प्रमाण कमी आहे. खटाव - माणला वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर सिंचन योजनेचे पाणी येरळा नदी व माणगंगेला प्रवाहित केले असते तर हे पाण्याचे भीषण संकट उद्भवले नसते, असे जाणकारांमधून मत व्यक्त होत आहे. दोन्ही तालुक्यातील सिंचन योजनेद्वारे येणारे पाणी याबाबत दुजाभाव झाल्याच्या चर्चा खटाव तालुक्यात सुरु आहेत. शेतीसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने आवाज उठवून प्रशासनाला वेठीस धरले होते. या आंदोलनाचे फलित म्हणून उशिरा का होईना खटाव तालुक्यात अत्यल्प पाणी सोडण्यात आले.पाण्याअभावी शेतीपिके करपून गेली. तर सध्या जनावरे व माणसांच्या पाण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील जनतेची भटकंती सुरु आहे.

खटाव तालुक्यातील ६८ हजार लोकांना पाणीबाणीखटाव तालुक्यातील ४१ गावे आणि १०७ वाड्या-वस्त्यांमध्ये ६७ हजार ९६४ बाधित लोकसंख्या व १२ हजार ८९२ बाधित पशुधन असल्याने २९ खासगी टँकर व दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये मांजरवाडी , गोसाव्याचीवाडी, मांडवे, पेडगाव, गोपूज, सातेवाडी, नवलेवाडी, मोळ, राजापूर, रणसिंगवाडी, रेवलकरवाडी, पांढरवाडी, हिंगणे, तडवळे, एनकूळ, डांभेवाडी, कणसेवाडी, धारपुडी, गादेवाडी, दरुज, खटाव, गारवडी, आवळे पठार, जाखणगाव, औंध, भोसरे, लोणी, कोकराळे, अंभेरी, शिंदेवाडी, कानकात्रे, ढोकळवाडी, कलेढोण, जायगाव, कामथी, उंबरमळे, शिंदेवाडी कटगुण, कातळगेवाडी, धोंडेवाडी, पळसगाव, दातेवाडी, अनफळे, पडळ अशा गावांमध्ये दैनंदिन ६७ टँकर खेपा सुरू आहेत. तर यासाठी १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत .

माण तालुक्यात १ लाख लोकसंख्येला पाणीटंचाईमाण तालुक्यात १ लाख ८ हजार ८७५ बाधित लोकसंख्या व १ लाख ६२५० बाधित पशुधन आहे. एकूण ६० गावे आणि ३७० वाड्या-वस्त्यांना ७८ टँकर द्वारे १५१ दैनंदिन टँकर खेपामधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर यासाठी २६ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. दोन्ही तालुक्यातील उन्हाचा पारा ४० शी ओलांडत चालला असून, पाण्याची पातळी मृत साठ्याच्याही खाली गेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.

जिल्ह्यातील पाणी साठ्याचे सुयोग्य नियोजन केले असते तर ही वेळ खटाव - माण तालुक्यावर आलीच नसती, अशी टीका खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरणारी जनता तर लोकसभेच्या प्रचारासाठी स्वहित जोपासत मेळावे घेणारे राजकीय नेते असे विदारक चित्र सध्या खटाव - माण तालुक्यात दिसून येत आहे .

दुष्काळाचे गडद सावट....राजकीय नेत्यांचे दुर्लक्षखटाव व माण तालुक्यात १०१ गावे आणि ४७७ वाड्यांमधील १ लाख ७६ हजार ८३९ बाधित लोकसंख्या व १ लाख १९ हजार १८२ बाधित पशुधनासाठी १०९ टँकरद्वारे दैनदिन २४४ खेपांमधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर दोन्ही तालुक्यांत एकूण ४५ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खटाव - माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.

टॅग्स :satara-pcसाताराdroughtदुष्काळ