खासदार श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी तासवडे एमआयडीसीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. संजय पिसाळ, अधिकराव डुबल, सागर जोशी, विष्णू शिंदे, निवास पवार, विशाल शिंदे, राजेंद्र पाटील, सागर शहा, मयेकर तांबोळी आदींसह अन्य उद्योजक उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीत विविध प्रकारच्या उत्पादन व प्रक्रिया करणाऱ्या दीडशेहून अधिक लहानमोठ्या कंपन्या आहेत. मात्र, वसाहतीत प्रामुख्याने विजेची मागणी वाढली असून, त्याप्रमाणात विजेचा पुरवठा होत नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी यावेळी सांगितले. येथील कंपन्यात काम करणारे अनेक कामगार आहेत. त्यांच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोणातून याठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल असावे. तसेच औद्योगिकरणच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून फायर स्टेशन उभारावे. याशिवाय असोसिएशनसाठी एखादे भवन बांधण्यात यावे, यासह अन्य मागण्या सागर जोशी यांनी यावेळी केल्या. समस्या समजावून घेतल्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी जागेवरूनच संपर्क साधून सदर समस्यांचे निराकारण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जितेंद्र जाधव यांनी स्वागत केले. अभय नांगरे यांनी आभार मानले.
फोटो : ०८केआरडी०२
कॅप्शन : तासवडे, ता. कऱ्हाड येथील औद्योगिक वसाहतीस भेट देऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी उद्योजकांशी चर्चा केली.