शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाटणला पुन्हा खासदारकी मिळणार का ? : श्रीनिवास पाटील, नरेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:01 IST

अनेक वर्षांपासून पाटण तालुक्याने केंद्रात केलेल्या नेतृत्वाला मतदार संघ विभाजनाचा फटका बसला आणि तालुक्याची खासदारकीची परंपरा दहा वर्षांपूर्वी खंडित झाली. कोणाला कोणत्या पक्षातून

ठळक मुद्देपुन्हा नेतृत्व मिळणार का? ; केंद्राच्या राजकारणातही होता दबदबा

रवींद्र माने ।ढेबेवाडी : अनेक वर्षांपासून पाटण तालुक्याने केंद्रात केलेल्या नेतृत्वाला मतदार संघ विभाजनाचा फटका बसला आणि तालुक्याची खासदारकीची परंपरा दहा वर्षांपूर्वी खंडित झाली. कोणाला कोणत्या पक्षातून संधी मिळणार? याहीपेक्षा पुन्हा तालुक्याला नेतृत्व मिळणार का, या आशेने मतदारांसह कार्यकर्तेही लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

पाटण तालुक्यातील दिवंगत आनंदराव चव्हाण, दिवंगत प्रेमलाकाकी चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आदींनी सातारा, सांगली जिल्ह्याचे नेतृत्व केंद्रात केले. आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून याच तालुक्यातील माथाडी चळवळीचे नेते नरेंद्र पाटील अथवा राष्ट्रवादीतून श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

दरम्यान, यावेळी राजकीय पक्षाऐवजी किमान कºहाड, पाटणकर मंडळी घरच्या उमेदवारालाच जास्त पसंती देतील, असे चित्र दोन्ही तालुक्यांत दिसत आहे. आपल्या तालुक्यातील उमेदवार हाय का? या एकाच विषयावर अलीकडे चर्चा रंगू लागल्या आहेत.कºहाडचे रहिवासी असले तरी पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातील कुंभारगावच्या चव्हाण आणि मारुल हवेलीच्या पाटील कुटुंबातील मातब्बरांनी देशाच्या राजकीय क्षेत्रात दिशादर्शकाची यशस्वी भूमिका पार पाडली आहे. जवळपास संसदेच्या स्थापनेपासूनच म्हणजे १९५७ पासून दिवंगत खासदार आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब रामराव चव्हाण यांनी शेतकरी कामगार पक्षातून कºहाड लोकसभा मतदार संघाची धुरा खांद्यावर घेतली. त्यावेळचे मातब्बर असलेल्या रामानंद भारती यांचा पराभव झाला होता.

सन १९६० मध्ये खासदार दाजीसाहेब यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुन्हा ते १९६२ मध्ये याच मतदार संघातून निवडून येऊन खासदार झाले. दाजीसाहेबांनी १९५७ मध्ये खांद्यावर घेतलेली खासदारकीची पताका सन १९७३ पर्यंत म्हणजेच त्यांच्या देहावसानापर्यंत अखंडितपणे फडकत ठेवली. त्यांच्या मृत्यूनंतर या मतदार संघातील मतदारांनी पुन्हा त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकी यांना बिनविरोध निवडून देऊन काम करण्याची संधी दिली. काकी खासदार झाल्या आणि पुन्हा एकदा दुर्गम असलेल्या पाटण तालुक्यातील महिला दिल्लीमध्ये या मतदार संघाचे नेतृत्व करू लागली.

सन १९७९ ते १९८४ याच कालावधीमध्ये या मतदार संघाचे नेतृत्व कºहाड तालुक्याकडे म्हणजेच दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्याकडे मतदारांनी सोपवले. मात्र याही कालावधीमध्ये पक्षनेतृत्वाने खासदार काकींना राज्यसभेवर घेऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला. सन १९८४ ते १९९१ पर्यंत अखंडपणे काकींनी आपल्या कुशल बुद्धीने हा मतदार संघ ताब्यात ठेवला होता. त्यानंतर सन १९९१ मध्ये त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी या मतदार संघातून आपले नशीब अजमावले. माता-पित्यांनी या मतदार संघात सुमारे पस्तीस वर्षे केलेल्या कामाच्या जोरावर पृथ्वीराज चव्हाणही खासदार झाले आणि पाटण तालुका पुन्हा एकदा सन्मानाने उजळला.

सन १९९४ मध्ये काँग्रेसमधील काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली. तरीही चव्हाण घराणे राष्ट्रीय काँग्रेस सोबतच कायम राहिले. यावेळी मात्र या घराण्याची खासदारकीची परंपरा खंडित झाली; पण याचवेळी याच तालुक्यातील श्रीनिवास पाटील यांच्या रुपाने मारुल हवेलीचे एक नवे नेतृत्व उदयास आले. सनदी अधिकारी म्हणून केलेले काम आणि शरद पवारांचे मार्गदर्शन याच्या जोरावर या मतदार संघात श्रीनिवास पाटील यांनी विकासाचा आलेख नेहमीच चढता ठेवला.

श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना जरी हार मानावी लागली तरी झालेले खासदार हे पाटणचेच होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या हुशारीवर त्यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेवर घेऊन सन्मान केला. यामुळे पाटण तालुक्याला एकाच वेळी दोन-दोन खासदार मिळाले. त्यानंतर मात्र या मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि पाटणची पकड निसटली. त्यामुळे तसा विचार केला तर आणि तुलना करता अलीकडे पाटण आणि कºहाड तालुक्यात विकासाचा गाडा पूर्णत: थांबला. विद्यमान खासदारांवर जरी जनतेचे प्रेम निष्ठा असली तरी त्यांच्यासोबत असणाऱ्या मंडळींवर मतदार आणि जनता खूपच नाराज असल्याचे जाणवते.

एकूणच आता या मतदार संघात उमेदवारांची चाचपणी चालू आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. तर भाजपाकडून पाटणच्याच नरेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, उमेदवारीबाबत पाटण तालुक्यातीलच जनतेला मोठी उत्सुकता लागली आहे. कोणत्या पक्षातून उमेदवारी कोणाला मिळेल, याहीपेक्षा तालुक्यातील कोणाला उमेदवारी मिळेल. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, खासदार पाटणचाच करायचा. या मानसिकतेमध्ये तालुक्यातील जनता असल्याने निर्माण झालेल्या या वातावरणाचा भाग्यवान कोण? नरेंद्र पाटील की श्रीनिवास पाटील, हे उमेदवारीवरूनच ठरेल, हे निश्चित.

इतिहास पाटणचा... खासदार परंपरेचा...आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाणसन १९५७ ते १९६२ : कºहाड लोकसभा खासदारसन १९६२ ते १९६४ : संरक्षण राज्यमंत्रीसन १९६४ ते १९६६ : अन्न व कृषी मंत्रीसन १९६७ ते १९६९ : कामगार पुनर्वसन मंत्रीसन १९६९ ते १९७१ : पेट्रोलियम मंत्रीदिवंगत खासदार प्रेमिलाकाकी चव्हाणसन १९७३ : कºहाड लोकसभा बिनविरोध निवडसन १९७७ ते १९७९ : कºहाड लोकसभा खासदार म्हणून फेरनिवडसन १९८० ते १९८४ : राज्यसभेवर निवडसन १९८४ ते १९८९ : खासदारसन १९८९ ते १९९१ : खासदारपृथ्वीराज चव्हाणसन १९९१ ते १९९९ : कºहाड लोकसभा खासदारसन २००५ ते २०१३ : राज्यसभा सदस्य व केंद्र्रातील विविध खात्यांचे मंत्रीश्रीनिवास पाटीलसन १९९९ ते २००४ : कºहाड लोकसभा खासदारसन २००४ ते २००९ : कºहाड लोकसभा खासदार

आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून याच तालुक्यातीलमाथाडी चळवळीचे नेते नरेंद्र पाटील अथवा राष्ट्रवादीतून श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.