शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

वन्यप्राण्यांचा धुमाकूळ -अडीचशे एकरांत नुकसान : रानडुक्कर, गव्यांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:17 IST

दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुक्कर जुमानत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. काही शेतक-यांची शिवारे लांब आणि अडवळणीच्या ठिकाणी असल्याने रात्री तेथे राखणीला थांबणे शक्य होत नाही.

सणबूर : रानडुक्कर आणि गव्यांच्या कळपांनी ढेबेवाडी विभागातील भोसगाव येथील शेतशिवार परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महिनाभरातच सुमारे अडीचशे एकरांतील रब्बी ज्वारीचे पीक त्यांनी फस्त केल्याचे वनविभागाकडे आलेल्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांची स्थिती आभाळ कोसळल्यासारखी झाली आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्र्रवाने हैराण झालेल्या ढेबेवाडीतील डोंगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला रामराम ठोकल्याने पडीक क्षेत्र वर्षागणिक वाढत चालले आहे. जवळपास खाद्य उपलब्ध होत नसल्याने वन्यप्राण्यांनी आजूबाजूच्या सपाटीच्या गावांकडे मोर्चा वळविला आहे. तेथील शेती वाचवतानाही शेतकºयांच्या नाकीनऊ येत आहे. काळगाव परिसरात सध्या गव्यांचा तर ढेबेवाडी खोºयात रानडुकरांचा उपद्र्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रब्बी ज्वारीचे पीक काढणीला आले असतानाच शिवारेच्या शिवारे रातोरात फस्त होऊ लागल्याने तोंडचा घास हिरावल्यासारखी शेतकºयांची अवस्था झाली आहे. खरिपाच्या ऐन पीक काढणीच्या वेळेलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे संकरित ज्वारीचे उभे पीक जागेवरच अंकुरल्याने शेतकºयांच्या सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या.

मात्र, वन्यप्राण्यांच्या उपद्र्रवाने हा हंगामही वाया गेल्याची शेतकºयांची भावना झाली आहे. दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुक्कर जुमानत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. काही शेतक-यांची शिवारे लांब आणि अडवळणीच्या ठिकाणी असल्याने रात्री तेथे राखणीला थांबणे शक्य होत नाही.

सकाळी पाहावे लागते उद्ध्वस्त पीकशेतातील काम आटोपल्यानंतर शेतकरी घराकडे जातात. त्यावेळी पीक चांगले असते. मात्र दुसऱ्या दिवशी शेतात येताच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त पीक पाहून धक्का बसतो. वन्यप्राणी रात्रीत पिकाची पूर्णत: नासाडी करतात.

खरिपातील ज्वारीचे पीक पावसामुळे हातातून गेल्याने सर्व आशा रब्बी ज्वारीवरच होत्या; पण काढणीला आठवडा उरला असतानाच एकरातील ज्वारीचे पीक रानडुकरांनी रातोरात फस्त केले.- किरण देशमुख, नुकसानग्रस्त शेतकरी, भोसगाव

वनविभागाच्या कार्यालयाकडे पीक नुकसानीच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जात आहेत.- एस. एस. राऊत, वनपाल

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी