शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
5
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
6
 सोनिया दुहनबाबत विचारताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात, म्हणाले, "त्या काय…’’ 
7
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
8
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
9
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
10
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
11
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
12
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
13
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
14
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
15
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
16
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
17
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
18
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
20
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

कास पठारावर रानफुलांचा बहर; धबधब्यासह निसर्गसौदर्य अनुभवण्यास पर्यटकांचा साताऱ्याकडे ओढा

By दीपक शिंदे | Published: July 01, 2023 5:10 PM

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर आषाढ बाहुली अमरी, गजरा अमरी, पवेटा इंडिका, सापकांद्याचे काही तुरळक ठिकाणी दर्शन होत ...

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर आषाढ बाहुली अमरी, गजरा अमरी, पवेटा इंडिका, सापकांद्याचे काही तुरळक ठिकाणी दर्शन होत आहे. कास पठार परिसरातील डोंगरमाथ्यावर काही ठिकाणी रानफुलांचा बहर अत्यंत मनमोहक दिसत आहे. बहुतांशी ठिकाणी फुललेला सातारीतुरा कास पठार परिसरातील जैवविविधतेचे भूषण म्हणून ओळखले जाते. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धबधबे कोसळून लागले आहेत. या धबधब्यांसह कासचे निसर्गसौदर्य अनुभवयास पर्यटकांची पावले साताऱ्याकडे वळू लागली आहेत.

आषाढ बाहुली अमरीआषाढ महिन्याच्या आसपास जांभ्या खडकात मातीच्या भागात उगवते. पाने लहान आकाराची असून जमिनीलगत असतात. त्यावर देठ असून त्यामध्ये दोन-तीन फुले येतात. पांढऱ्या रंगाच्या फुलांचा आकार सुबक बाहुलीसारखा दिसतो म्हणून बाहुली अमरी म्हणतात. शास्त्रीय भाषेत हबेनारिया ग्रँडिफ्लोरीफोरमीस नाव आहे. कास पठार, इतर सड्याच्या भागात जून महिन्यात प्रथम दर्शन देणारी पांढऱ्या फुलांची वनस्पती म्हणून ओळख आहे. अशाच प्रकारच्या याच हंगामात पाचगणांसीस हबेनारियादेखील पाहायला मिळतात.

सापकांदाकास पठारासह आसपास डोंगरमाथ्यावर पांढरा सापकांदा( आरोशिमा मुराई) दर्शन देऊ लागला आहे. यालाच नागफणी असेही म्हणतात. शेंड्याकडील भागात दिसत असलेले झाकण पाऊस, उन्हापासूनचे संरक्षक कवच आहे. वरच्या कवचाला टोक असते. कंद परिपक्व झाल्यानंतर रानडुकरे खातात. हिरवी दांडी, तोंड पांढरे, सापासारखे वाकलेले असते,त्यामुळे पांढरा सापकांदा म्हणतात.गजरा आमरीझाडावरचे आर्किड आहे. मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्यामध्ये पाहायला मिळतात. ग्रामीण भागात कानठिळी म्हणतात. गजरा आमरी या फुलाला एरिडस क्रिसपम या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. जाडसर, लांब पाने असतात. गुलाबी रंगांची फुले दिसतात.वायतुरासातारीतुरा फूल शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हटले जाते. दुर्मीळ वनस्पतींपैकी मुळाशी कंद असणारे भुईऑर्किड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग त्यामध्ये पाणी साचते अशा ठिकाणी वनस्पती आढळते. जमिनीत छोटा कंद असतो. त्यावरील पान लांब, जाडसर आकाराचे असते. भाल्यासारखे दिसते. पानांमध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असतो. दोन-तीन पानांच्या बेचक्यातून लांब, जाडसर अशा दांड्यात इंग्रजी वाय आकाराचा तुरा येतो, म्हणून यास वायतुरा म्हणतात. हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार-पाच ठिकाणीच सड्यावर आढळते.भुईचक्रइपिजिनिया इंडिका शास्त्रीय नाव आहे. लसूण, कांद्यासारख्या बारीक पाती असतात. खाली कंद असतो. दहा-बारा दिवसांनंतर एकच बोंड अथवा गाठ तयार होते. त्यात मोहरीसारखे चार-पाच दाणे असतात. बोंड फुटून हे दाणे एक मीटर अंतरावर पडतात. निळसर, लाल रंगाचे फूल दिसते.

जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान तृण, कंद, वेली, तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल, रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलाचे गालिचे आकर्षित करतात. - अभिजित माने, परिवीक्षाधीन वनक्षेत्रपाल, मेढा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन