शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेदम मारहाण करून पत्नीचा खून, चारीत्र्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:42 IST

चारित्र्याच्या संशयावरून पतीने बेदम मारहाण करीत पत्नीचा खुन केला. बनवडी ता.कऱ्हाड येथे मंगळवारी रात्री हि घटना घडली. या प्रकरणी पतीला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देबेदम मारहाण करून पत्नीचा खून, चारीत्र्याचा संशय अपत्य होत नसल्यामुळे वारंवार वाद

कऱ्हाड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने बेदम मारहाण करीत पत्नीचा खुन केला. बनवडी ता.कऱ्हाड येथे मंगळवारी रात्री हि घटना घडली. या प्रकरणी पतीला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली आहे.प्रतीभा उर्फ जयश्री जालिंदर वाघमारे (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती जालिंदर प्रताप वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील हेळगाव येथील जालिंदर वाघमारे हा बनवडी येथे भाडेतत्वावर खोली घेऊन पत्नी प्रतीभा हिच्यासह वास्तव्यास होता.

जालिंदर आणि प्रतिभा यांच्या विवाहाला अनेक वर्ष झाली आहेत. मात्र, त्यांना अपत्य नव्हते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होता. तसेच जालिंदर हा प्रतिभाच्या चारीत्र्यावरही संशय घेत होता. मंगळवारी दुपारी तो एका घरात मद्यप्राशन करीत बसला होता. त्यावेळी प्रतिभा त्याठिकाणी आली. तीने त्याला दारू पिण्यास अटकाव केला. त्यावेळी जालिंदरने प्रतिभाला मारहाण केली. त्यानंतर दिवसभर तो वारंवार तिला मारहाण करीत होता.दरम्यान, रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा वाद झाल्यानंतर जालिंदरने प्रतिभाला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यामध्ये जागीच तीचा मृत्यू झाला. प्रतिभाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर तो थेट पोलीस ठाण्यात गेला.

घटनेची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत घटनास्थळ गाठले. पंचनामा झाल्यानंतर पहाटे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच बुधवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर