शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जे पक्ष जोडू शकत नाहीत, ते देश काय जोडणार? रामदास आठवलेंची राहुल गांधींवर टीका 

By प्रमोद सुकरे | Updated: September 9, 2022 10:39 IST

आठवले म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही.

कराड - ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी  बोचरी टीका केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोल आठवलेंनी यावेळी केला. कराड येथील शासकीय विश्रामग्रहात आठवलेंनी पत्रकारांची संवाद साधला.

आठवले म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल असेही ते म्हणाले.

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मनसेला बरोबर घेऊ नये.  शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याचेही रामदास आठवले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

केंद्रीय मंत्री आता बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यासाठी येणार असून शरद पवारांची बारामती आपल्या ताब्यात कशी येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. बारामती मतदार संघात भाजपची हवा असल्याने बारामतीची जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. तसेच २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस