शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: स्वत:च्या शेतात गवत पेटविले, आग लागली दुसऱ्याच्या उसाला; दोघांवर गुन्हा नोंद

By नितीन काळेल | Updated: March 3, 2023 14:17 IST

शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सातारा : शेतातील गवत पेटविताना आवश्यक ती उपाययोजना न केल्याने शेजारील शेतकऱ्याच्या उसाला आग लागली. तसेच शेती साहित्याचेही नुकसान झाले. ही घटना माण तालुक्यातील वडगाव येथे घडली. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विजयकुमार दगडू ओंबासे (रा. वडगाव) या शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रघुनाथ गणपत बोराटे, विशाल रघुनाथ बोराटे (दोघेही रा. बिदाल, ता. माण) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. १ मार्च रोजी सकाळच्या सुमारास वडगाव येथील खोरीचा तलाव नावाच्या शिवारात हा प्रकार घडला आहे. संशयितांनी स्वत:च्या शेतातील गवत पेटविले होते; पण आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे गवताला लागलेली आग तक्रारदाराच्या उसात गेली. तक्रारदाराचा एक वर्ष झालेला ३० गुंठे क्षेत्रात ऊस होता. तसेच ठिबक सिंचनची पाइप, केबल तसेच इतर शेती उपयोगी साहित्य आगीत सापडले. आग लागल्याने आंब्याचे झाडही होरपळले. त्याचबरोबर आग पसरत गेल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार बी. एस. खांडेकर हे अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग