शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कराडच्या तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना नेमकं शोधायचं तरी कुठं?, क्रीडा संकुल असून अडचण नसून खोळंबा

By प्रमोद सुकरे | Updated: May 10, 2023 19:07 IST

प्रमोद सुकरे कराड: ग्रामीण भागातील विद्यार्थी, मुले खेळामध्ये तरबेज व्हावीत. त्यांना त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि साधने उपलब्ध व्हावीत ...

प्रमोद सुकरेकराड: ग्रामीण भागातील विद्यार्थी, मुले खेळामध्ये तरबेज व्हावीत. त्यांना त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि साधने उपलब्ध व्हावीत यासाठी क्रीडा संकुल आणि त्याचबरोबर  तालुकास्तरीय स्पर्धांचे नियोजन करणे, खेळाडूंच्या सवलतीबाबत पत्रव्यवहार करणे आदी कारणांसाठी तालुक्याला क्रीडा अधिकारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पण कराड तालुक्याच्या क्रीडा अधिकार्यांना नेमके शोधायचे कुठे? असा प्रश्न खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना पडतोय.कराड तालुक्याला क्रीडा अधिकारी म्हणून संगिता जगताप यांची नियुक्ती आहे. पण त्या कराडला कितिदा आल्या हे समजायला मार्ग नाही. मग त्यांनी येथे येवून काम काय केले हा भाग निराळाच.खरंतर तालुका क्रिडा अधिकार्यांचे  कार्यालय  हे क्रीडा संकुलात असले पाहिजे. पण ते बंद आहे. क्रीडा संकुलनाचा वापरच नाही. त्यामुळे तालुका क्रिडा अधिकार्यांना मग शोधायचं कुठे? हा प्रश्न पडणारच.याबाबत अधिक माहिती घेतली असता सातारा जिल्ह्याला तालुका क्रीडा अधिकार्यांची ३ पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात २ पदे भरलेली आहेत. अन ११ तालुक्यातील कारभार हाकायचा आहे. त्यामुळे हे तालुका क्रिडा अधिकारी सगळीकडे पुरु शकत नाहीत.पण त्या कारणाखाली तालुका क्रिडा अधिकारी वर्ष वर्षभर इतर तालुक्याला फिरकत नाहीत ही मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल. 

जिल्ह्यात सर्वात जास्त मोठा तालुका म्हणून कराड तालुक्याची ओळख आहे. ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्यासारख्या अनेकांचा क्रीडा क्षेत्रातील मोठा वारसा कराडला आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकार्यांनी कराडचा विचार करताना जरा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय येथे तालुका क्रीडा संकुल इमारत चांगल्या पद्धतीने उभी आहे .त्याचा वापर कसा करून घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.जिल्हा क्रीडा अधिकारी उवाचयाबाबत सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याशी संपर्क साधला असता कराडचे तालुका क्रीडा संकुल तयारच आहे. तेथे लाईट, पाणी सोय करण्यात आली आहे. व्यायामाचे साहित्य आठवड्याभरात पोहोच होणार आहे. एक कोच नेमण्यात आला आहे. आता लोकांनी त्याचा वापर करायला हवा असे ते सांगतात. पण तेथील वॉचमन, शिपाई, क्लार्क यांची कामे नेमकी कोण करणार? हे मात्र ते सांगत नाहीत.

दरम्यान कराडच्या तालुका क्रीडा अधिकारी संगीता जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्या कराडला आल्या आहेत किंवा नाही हे समजू शकले नाही.

संगीता जगताप यांच्याकडे कराडच्या तालुका क्रीडा अधिकार पदाची जबाबदारी आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार ,मंगळवार, बुधवार या दिवशी त्यांनी कराड या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजे असे त्यांना लेखी पत्र दिले आहे. त्याची अंमलबजावणी होईल. - युवराज नाईक  जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसर