शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

'आपले राज्य आज कोठे आहे?', पृथ्वीराज चव्हाणांनी कोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 23:54 IST

आज सरकारची आर्थिक परिस्थिती मोठी वाईट आहे. कर्ज वाढत चालले आहे. व्याज वाढत चालले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

-प्रमोद सुकरे, कराड"आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पनातून सर्व वर्गाला मोठ्या आशा होत्या. मात्र यातून कोणत्याही घटकाला समाधान  मिळालेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे", असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी महायुतीने विधानसभेला दिलेली आश्वासने आणि राज्याच्या आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावर बोट ठेवले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, महिला सर्वांचेच डोळे लागले होते.पण कर्जमाफीची घोषणा न केल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीनेलाडकी बहीण योजना सुरू केली. प्रत्येक महिलेला १५०० रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय राबविला. त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. पण पुन्हा सत्तेत आलो तर ही रक्कम २१०० रुपये वाढवून देण्याचे दिलेले आश्वासन या सरकारने पाळलेले दिसत नाही.

आज सरकारची आर्थिक परिस्थिती मोठी वाईट आहे. कर्ज वाढत चालले आहे. व्याज वाढत चालले आहे. त्यामुळे विकासाला निधी कमी पडत आहे. फक्त मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. पण ज्या विभागांना मोठ्या प्रमाणात निधी वर्ग व्हायला पाहिजे त्यांना निधी मिळताना दिसत नाही.

महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे. पण प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न जर काढले तर आपले राज्य आज कोठे आहे? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यामध्ये इतर राज्ये पुढे गेली आहेत ही बाब ध्यानात घेण्याची गरज आहे असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahayutiमहायुतीladki bahin yojanaलाडकी बहीण योजना