शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

मोफत आहाराचा निधी जातोय तरी कुठे? पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:36 PM

रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत मिळणारा सरकारी निधी व प्रसूती मोफत आहाराच्या शासकीय अनुदानाचा योग्य वापर होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने निधी जातोय कुठे की

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना १९९० मध्ये झाली असून, नगरपरिषद कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदचे आरोग्य केंद्र

शशिकांत क्षीरसागर ।धामणेर : रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत मिळणारा सरकारी निधी व प्रसूती मोफत आहाराच्या शासकीय अनुदानाचा योग्य वापर होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने निधी जातोय कुठे की कागदोपत्री दाखवला जातोय, असे अनेक प्रश्न रुग्णांना पडत असून, तशी चर्चा परिसरात सुरू आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना १९९० मध्ये झाली असून, नगरपरिषद कार्यक्षेत्रात जिल्हा परिषदचे आरोग्य केंद्र असल्यामुळे दोन्ही पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र यात रुग्णांचे हाल होत आहेत. परिसरातील सुमारे तीस गावांचा समावेश आहे. या केंद्रात महिन्याला सरसरी दहा ते बारा प्रसूती होत असतात. त्यावेळी पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेचा लाभ पाच हजार रुपये देण्यासाठी शासकीय नियमानुसार कागदपत्रे घेतली जातात.

महिलांना तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगितले जाते; परंतु एक वर्ष उलटले तरी पैसे जमा झाले नाहीत, महिलांना बँक कर्मचारी केंद्रात व केंद्रातील बँकेत हेलपाटे मारायला लावत आहेत. त्यामुळे काहींनी तर पैसाचा विचारच सोडून दिला आहे, हे समोर आले आहे. तसेच प्रसूतीग्रस्त महिलांसाठी प्रती महिलेस प्रसूती आहार योजनेतून शासनाकडून ७० रुपये येतात; परंतु सर्वांना त्याचा लाभ दिला जात नाही. मात्र कागदोपत्रीत दाखवले जातात, त्यामुळे महिलाचे जेवणाचे हाल होत आहेत.

इंजेक्शनसाठी दहा ते वीस रुपये व सलाईनसाठी शंभर रुपये घेतले जातात, असे समजते. अशी चर्चाही उघडपणे रुग्णांमध्ये चालू असते; मात्र तक्रार करायला कोणी पुढे येत नाही. फलक मात्र मोफत लावलेले दिसतात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. रात्री डॉक्टर नसतात, त्यामुळे रुग्ण गाडी करून इतर दवाखान्यात पाठवावे लागतात, अशा असंख्य समस्यांच्या विळख्यात आरोग्य केंद्र आहे. रुग्ण कल्याण समितीनेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार