शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

साताऱ्यातील डीपी बोले तो ‘डेथ पास’!

By admin | Updated: October 30, 2015 23:45 IST

गल्लोगल्ली मृत्यूचा सापळा : मांजा काढताना विजेचा झटका बसल्याने विद्यार्थी जखमी तरीही फ्युजपेट्या उघड्याच--आॅन दि-स्पॉट

सातारा : वाढलेली झाडी, कचरा कुंडी म्हणून होणारा वापर, मृत जनावरे आणून टाकण्याचे ठिकाण म्हणून अलीकडे डीपी बॉक्स ठेवलेल्या जागांचा वापर होताना दिसत आहे. वीजवितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे गेल्या काही दिवसांत हे डीपी मृत्यूचा शॉर्टकट ‘आ’ वासून उभे असल्याचे धक्कादायक वास्तव शहरात पाहायला मिळाले. डीपी म्हणजे मृत्यूच्या जवळ नेणारे ‘डेथ पास’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.मंगळवारी शहरातील मंगळवार तळे परिसरात सोमनाथ ढेबे या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील डीपी आणि सामान्यांची सुरक्षितता याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परिसरातील नागरिकांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून येथील डीपीचे दार लावण्याचीही तसदी कोणी घेत नव्हते. या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील विविध भागांतील डीपींची अवस्था पाहताना अंगावर शहारे आले. कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय वीजवितरण कंपनीने या डीपींची उभारणी केली आहे.शालेय वयात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोडकरपणा असतो. आपल्या मित्रांमध्ये आपण ‘हिरो’ ठरावे, यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे पालकांनीही मुलांना धोक्याची समज देणे आवश्यक आहे. नित्यनियमाने मुलांचे होणाऱ्या अपघातांविषयी घरात मुलांशी चर्चा होणे आवश्यक असते. हा अपघात का घडला, त्यातील धोके काय होते, ते कसे टाळता आले, असते याविषयी जेवतानाही बोलणे शक्य आहे. घरांमध्ये मुलांना समजायला नको म्हणून अशा चर्चा होत नाहीत, त्यामुळे पुढील अनेक धोके संभवतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कृती केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम मुलांना सांगितले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात. पालकांनीही बोलते झाले पाहिजे. (प्रतिनिधी)चक्क जाहिरातींसाठी वापर सातारा शहरात जुना आरटीओ रस्त्यावर एक वीजवितरणचा डीपी आहे. त्यावर चक्क जाहिराती लावण्यात आल्या आहेत. दुकानात काही आणण्याच्या निमित्ताने फूटपाथवरून जाणाऱ्या चिमुरड्यांच्या हाताला हा डीपी सहज येतो. डीपी वर चिटकवलेल्या जाहिरातीचा कागद फाडण्याच्या नादात जर लहानग्यांनी त्याला हात लावला तर मोठा अनर्थ घडू शकतो, असे येथील स्थानिक सांगतात. त्यामुळे येथे जाहिराती चिटकविण्यापेक्षा धोक्याची सूचना लिहिण्यात यावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.उघड्या फ्युजपेट्याशहरातील बहुतांश फ्युजपेट्या पत्र्याच्या आहेत. त्यांना कडी-कोयंडा नाहीत. या पेट्यांचा वापर चित्रपटांचे पोस्टर, जाहिराती चिटकविण्यासाठी केला जात आहे. हे चिटकवत असताना मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाला आहे. त्यामुळे या पेट्या बदलून त्याठिकाणी जाहिराती चिटकविण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.