शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: रेल्वेच्या रिकाम्या ऑइल टँकरची चाके घसरली, पुणे-मुंबईकडील वाहतूक विस्कळीत 

By प्रगती पाटील | Updated: December 16, 2023 16:12 IST

कोयना, मैसूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस दीड तास विलंबाने

कोरेगाव : पुणे-मिरज लोहमार्गावर कोरेगाव आणि सातारा रेल्वे स्थानकांदरम्यान तांदूळवाडीनजीक असलेल्या खिंडीजवळ शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरली. सातारा आणि पुणे दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, मिरज व कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. कोयनासह मैसूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तब्बल एक ते दीड तास विलंबाने धावत होत्या.डाऊन मार्गावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली. कोरेगावकडून साताराच्या दिशेने जात असताना तांदूळवाडी गावानजीक रिकाम्या ऑईल टँकरची चाके रूळावरून घसरली. त्यामुळे पुणे आणि मुंबई मार्गांवरील वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली. ऑईल टँकरची चाके रूळावरून बाजूला काढून मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यास खूप वेळ जाण्याची शक्यता आहे.त्यासाठी मिरज येथून क्रेन पाठवण्यात येणार आहे. तोपर्यंत पुणे, मुंबईच्या दिशेने भारतात विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत. काही एक्सप्रेस या अपघातामुळे रखडल्या आहेत. मात्र, मिरज, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला नाही. अपघातस्थळी आणि कोरेगाव रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत.

मिरजेहून मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या रिकाम्या ऑइल टँकरचे इंजिन कोरेगाव स्थानकावर सोडविण्यात आले. ते इंजिन तांदूळवाडी येथे नेऊन अपघातग्रस्त ऑईल टँकर सोडून अन्य शिल्लक असलेले रिकामे ऑइल टँकर कोरेगाव स्थानकावर आणण्याचे रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वेMumbaiमुंबई