शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

CoronaVirus Lockdown : पोटासाठी काय पण: खाण्यासाठी पशुपक्षी थेट गावात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:11 IST

शक्यतो कधीही न माणसाळणारे पशुपक्षी सध्या खाण्या-पाण्याच्या शोधार्थ नागरीवस्तीत येऊन आपली तहान, भूख भागविण्यासाठी गावागावात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा संपला असला तरी ग्रामीण भागातील रानोमाळ भटकणारे पशुपक्षी आपल्या अन्नपाण्यासाठी थेट गावात येऊ लागले आहेत. यंदाचा उन्हाळा व लॉकडाऊन सर्वांनाच खूप त्रासाचा ठरला आहे, असे वाटू लागले आहे.

ठळक मुद्दे पोटासाठी काय पण: खाण्यासाठी पशुपक्षी थेट गावात!नागरिक करतायत पशु-पक्ष्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था

रशिद शेखऔध: शक्यतो कधीही न माणसाळणारे पशुपक्षी सध्या खाण्या-पाण्याच्या शोधार्थ नागरीवस्तीत येऊन आपली तहान, भूख भागविण्यासाठी गावागावात येत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा संपला असला तरी ग्रामीण भागातील रानोमाळ भटकणारे पशुपक्षी आपल्या अन्नपाण्यासाठी थेट गावात येऊ लागले आहेत. यंदाचा उन्हाळा व लॉकडाऊन सर्वांनाच खूप त्रासाचा ठरला आहे, असे वाटू लागले आहे.यंदा कोरोनामुळे पशुपक्ष्यांना नागरिकांचे दर्शन दुर्मीळ झाले होते. बाजार, मंडई भरत नसल्याने पक्षी तसेच वानरसेना आता घरोघरी पोहोचू लागले आहेत. औंध परिसरातील अनेक गावांमधील नागरिक पशुपक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्था करू लागले आहेत. अनेक गावांमध्ये तरकारी उत्पन्न घेणारे शेतकरी यंदा निवांतच असल्याने उन्हाळ्यात पक्ष्यांचे व विशेषत: वानरसेनेचे पोटाचे हाल होत आहेत.अनेक ठिकाणचे पाणवठे, जलसाठे मोठ्या प्रमाणात कोरडे पडले आहेत. अजूनपर्यंत शेतांमधील सुगीला सुरुवात नाही. सर्वत्र रुक्ष वातावरण निर्माण झाले आहे. त्याची झळ अनेक पशु-पक्ष्यांना बसू लागली आहे. शेते मोकळी झाल्याने या प्राण्यांना त्याठिकाणी खायला काहीच उपलब्ध नाही.

पाणीसाठे मोकळे झाल्याने अन्नपाण्याच्या शोधासाठी वानरे, पक्षी व अन्य प्राणी गावांमध्ये येऊ लागले आहेत. मागील काही दिवसांमध्ये औंध, कुरोली, जायगाव, खरशिंगे, गोपूज व अन्य गावे वाड्या-वस्त्यांवरील वस्त्यांमध्ये त्यांनी ठाण मांडल्याने हे प्राणी माणसाळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना अन्नपाणी दिले जात आहे. पण काही ठिकाणी त्यांची भटकंती सुरू आहे. पुढील दोन महिने या मुक्या जीवांचे कसे जाणार? याचीच धास्ती निर्माण झाली आहे.मुक्या प्राण्यांसाठी संघटनांनी पुढाकार घ्यावा..औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी औंध येथील डोंगर परिसरात पक्ष्याचा वावर असलेल्या जवळपास वीस ठिकाणी दीड लिटर पाणी बसेल एवढे कॅन झाडांना अडकवून त्यांची व्यवस्था केली आहर. एक दिवसाआड त्यामध्ये पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पक्षी तेथे आपली तहान भागवतात. अशा अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

आमच्या घराच्या गच्चीवर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी माकडे येत असतात. आम्ही त्यांना भाकरी, चपाती तसेच अन्य खाद्यपदार्थ खाण्यासाठी देतो. अगदी माणसाळलेले आहेत. मुलेही जवळ जाऊन त्यांना खाऊ घालतात.-दीपक नलवडे,उपसरपंच, औंध

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरwildlifeवन्यजीव